लसीकरणात ज्येष्ठांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:33+5:302021-04-25T04:07:33+5:30

१,५३,८१७ ज्येष्ठांचे लसीकरण : दुसरा डोस घेण्यातही पुढेच लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन ...

Seniors lead in vaccination | लसीकरणात ज्येष्ठांची आघाडी

लसीकरणात ज्येष्ठांची आघाडी

googlenewsNext

१,५३,८१७ ज्येष्ठांचे लसीकरण : दुसरा डोस घेण्यातही पुढेच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणाऱ्या कमी वयाचे नागरिक यांना लस दिली जात आहे. २३ एप्रिलपर्यंत नागपूर शहरात ३ लाख ९७ हजार ७८६ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. यात सर्वाधिक १ लाख ५३ हजार ८१७ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

सर्वात आधी आरोग्य सेवकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. ४२,२०४ आरोग्य सेवकांनी पहिला डोस तर १७,९२६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४१,६०६ फ्रंटलाईन वर्कर्सना पहिला डोस तर १०,६१३ जणांनी दुसरा डोस घेतला. ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या ८८,१५५ नागरिकांनी लस घेतली तर, ४ ३२२ जणांनी दुसरा डोस घेतला. ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ७२,००१ नागरिकांनी पहिला तर ५,३५६ जणांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांवरील १,५३,८१७ ज्येष्ठांनी लसीचा पहिला तर २०,७२८ जणांनी दुसरा डोस घेतला. मागील काही दिवसात लसीकरणाची गती संथ झाली आहे. ती वाढविण्याची गरज आहे.

....

१५ ऑगस्टपर्यंत १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता, केंद्र सरकारने १५ ऑगस्टपर्यंत १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जााणार आहे. साडेतीन महिन्यात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण पूर्ण करावे लागणार आहे. यादृष्टीने मनपाला आपली यंत्रणा अधिक बळकट करावी लागणार आहे.

...

८८ केंद्रांवर शून्य लसीकरण

शहरात १८८ लसीकरण केंद्र आहेत. परंतु यातील ८८ केंद्रांवर लसीकरण बंद आहे. शुक्रवारी १०० केंद्रांवर ९,३५७ लाभार्थींना लस देण्यात आली. १५ ऑगस्टपर्यंत लसीकरण पूर्ण करावयाचे झाल्यास १ मेपासून दररोज २५ ते ३० हजार लाभार्थींना लस द्यावी लागेल. यासाठी लसीचा मागणीनुसार पुरवठा होणे गरजेचे आहे.

...

नागपूर शहरातील लसीकरण (२३ एप्रिलपर्यंत)

आरोग्य सेवक पहिला डोस - ४२,२०७

आरोग्य सेवक दुसरा डोस - १७,५२६

फ्रंटलाईन वर्कर पहिला डोस - ४१,६०६

फ्रंटलाईन वर्कर दुसरा डोस - ४,३२२

४५ वर्षांवरील सहव्याधी पहिला डोस - ७२,००१

४५ वर्षांवरील सहव्याधी दुसरा डोस - ५,३५६

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक पहिला डोस - १,५३,८१७

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक दुसरा डोस - २०,७२८

Web Title: Seniors lead in vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.