खळबळजनक : नागपुरात सात वर्षीय बालकाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 07:55 PM2018-09-29T19:55:14+5:302018-09-29T19:59:51+5:30

सात वर्षीय बालकाला फिरायला नेतो, असे सांगून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याचे अपहरण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे उघडकीस आले. आरोपी बिहारचा मूळ रहिवासी असल्याने त्याने अपहृत बालकाला बिहारमध्येच नेले असावे, असा संशय आहे. दरम्यान, अपहृत बालक आणि आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी धावपळ चालविली आहे.

Sensational: A seven-year-old child kidnapped in Nagpur | खळबळजनक : नागपुरात सात वर्षीय बालकाचे अपहरण

खळबळजनक : नागपुरात सात वर्षीय बालकाचे अपहरण

googlenewsNext
ठळक मुद्देओळखीच्या व्यक्तीने पळवून नेलेबिहारला घेऊन गेल्याचा संशयकळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सात वर्षीय बालकाला फिरायला नेतो, असे सांगून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याचे अपहरण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे उघडकीस आले. आरोपी बिहारचा मूळ रहिवासी असल्याने त्याने अपहृत बालकाला बिहारमध्येच नेले असावे, असा संशय आहे. दरम्यान, अपहृत बालक आणि आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी धावपळ चालविली आहे.
कळमन्याच्या दानामंडीत काम करणारा आरोपी मिथुन पाचमान (वय २५) मूळचा दरभंगा (बिहार) जिल्ह्यातील दरहाय ग्राम येथील रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने तो नागपुरात राहत होता. लक्ष्मीनगर कळमना येथील संगीता फेकन महातो (वय ३५) यांच्या नात्यात लागत असल्यामुळे त्यांच्याकडे आरोपीचे येणे-जाणे होते. गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास नेहमीप्रमाणे तो संगीताच्या घरी आला. यावेळी संगीता यांचा मुलगा धीरज (वय ७ वर्षे) बाजूला खेळत होता. त्याला फिरवून आणतो, असे म्हणत आरोपी मिथुनने धीरजला सोबत नेले. दोन, तीन तास होऊनही आरोपी मिथुन मुलाला घेऊन परतला नाही. त्यामुळे घाबरलेल्या महातो कुटुंबीयांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर तो आढळला नाही. आजूबाजूच्यांना विचारपूस केली असता आरोपी धीरजला घेऊन रेल्वेस्थानकाकडे गेल्याचे समजले. त्यामुळे संगीता यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
चौकशीत आरोपी आणि पीडित परिवार एकाच गावचे रहिवासी असल्याचे पुढे आले. नेहमी जाणे-येणे असल्यामुळे आणि चॉकलेट वगैरे घेऊन देत असल्यामुळे धीरज आरोपीच्या सोबत सहजपणे वावरत होता. आरोपी दिसला की धीरज त्याला दुकानात चलण्याचा आग्रह धरायचा. गुरुवारीदेखिल असाच प्रकार झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी आरोपीची शोधाशोध चालवली आहे.
आरोपीसोबत संपर्क नाही
आरोपीकडे मोबाईल नसल्याने मिथुनसोबत पोलिसांचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे तो धीरजसोबत नेमका कुठे आहे, ते स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आरोपीच्या मूळगावी राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांसोबत पोलिसांचा संपर्क झाला असून, तो शनिवारी दुपारपर्यंत तेथे पोहचला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अपहृत धीरजच्या पालकांसोबतच पोलिसांचीही अस्वस्थता वाढली आहे.

 

Web Title: Sensational: A seven-year-old child kidnapped in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.