हत्येच्या आरोपीची चौकशी न करताच कारागृहात पाठविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:34 AM2017-11-20T01:34:46+5:302017-11-20T01:37:03+5:30
विकृती जडलेला खतरनाक गुन्हेगार एका अल्पवयीन मुलाची हत्या करतो. हे हत्याकांड उघड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो एका पोलीस ठाण्यात एक रात्र आणि अर्धा दिवस मुक्कामी असतो.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकृती जडलेला खतरनाक गुन्हेगार एका अल्पवयीन मुलाची हत्या करतो. हे हत्याकांड उघड झाल्यानंतर दुसºया दिवशी तो एका पोलीस ठाण्यात एक रात्र आणि अर्धा दिवस मुक्कामी असतो. पोलीस त्याला रात्री अन् सकाळचे जेवण पुरवितात. सकाळ-दुपारचा चहा-नाश्ताही करवितात. तो हिस्ट्रीशिटर गुन्हेगार असूनही त्याने फरारीच्या काळात किती आणि कुठे गुन्हे केले, त्याची चौकशी करण्याचे कष्ट पोलीस घेत नाहीत. होय, पोलिसांच्याच अहवालानुसार चार जणांची हत्या करणारा आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, अट्टल गुन्हेगार छल्ला ऊर्फ दुर्गेश ध्रुपसिंग चौधरी हा अरमान नामक मुलाची हत्या केल्यानंतर काही तासातच कळमना पोलिसांच्या ताब्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याला बोलते करण्याऐवजी त्याच्या आदरातिथ्यावरच भर दिला अन् एमसीआरच्या नावाखाली कारागृहात पोहोचविले. ही धक्कादायक माहिती उघड झाल्यानंतर स्मार्ट आणि हायटेक पुलिसिंगचा दावा करणाºया नागपूर पोलिसांना बेसिंग पुलिसिंगचा विसर पडल्याचेही स्पष्ट झाले आहे. या घटनाक्रमामुळे सर्वसामान्यांसोबतच पोलीस दलातही चर्चेला उधाण आले आहे.
कोणत्याही गुन्हेगाराची माहिती एका क्लिकवर उपलब्ध असल्याचा दावा अलीकडे पोलीस करतात. गुन्हा घडल्यानंतर काही तासातच गुन्हेगाराची माहिती मिळू शकते, असे तंत्रज्ञान पोलिसांकडे उपलब्ध आहे. गुन्हेगाराला हुडकून काढण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅबही नागपुरात आहे. सीसीटीएनएसही आहे. मात्र, या सर्व सुविधा असूनही त्याचा वापर करण्याचे कौशल्य किती पोलीस अधिकारी-कर्मचाºयांच्या अंगी आहे, असा प्रश्न या प्रकरणाने उपस्थित झाला आहे. एक अट्टल गुन्हेगार १८ ते २० तास पोलिसांच्या ताब्यात असूनही त्याची झाडाझडती पोलिसांनी का घेतली नाही, हा प्रश्न गंभीरच नाही तर संशय वाढविणाराही आहे. कारण एप्रिलच्या दुसºया आठवड्यात रनाळा शिवारात छल्लाने कैलास नागपुरेची हत्या केली. त्यानंतर त्याने रेल्वेलाईनवर जाऊन नागपुरेचा मृत्यू रेल्वेच्या धडकेने झाल्याचा बनाव निर्माण केला. कामठी पोलिसांनी छल्लाच्या कटकारस्थानाचा छडा लावला नाही अन् नागपुरेच्या हत्येचे प्रकरण दबले. त्याचमुळे दुसºया आठवड्यात विकृत छल्लाने आरिफ अन्सारी नामक तरुणाची
हायटेक नेभळटपणा
पूर्वी खतरनाक गुन्हेगार हाती लागताच पोलीस त्याची वेगवेगळ्या पद्धतीने ठोकून बजावून चौकशी करीत होते. त्याने फरारीच्या काळात कुठे कुठे काय काय केले. ते वदवून घेतले जायचे. त्यावेळी पोलिसांकडे साधनसुविधाही तोकड्याच होत्या. आता स्मार्ट पुलिसिंगच्या नावाखाली हायटेक सुविधा मिळूनही पोलिसांना खतरनाक गुन्हेगारांना बोलते करण्याची सवड नसते. कळमना ठाण्यात आरिफ अन्सारीच्या हत्येचा गुन्हा दाखल होता. छल्ला क्रूर आणि अट्टल गुन्हेगार आहे, हे माहीत असूनही कळमना पोलिसांनी त्याची खातीरदारी करण्याऐवजी त्याला बोलते केले असते तर तीन आठवडेपर्यंत लकडगंज पोलिसांना आणि अरमान तसेच आरिफच्या नातेवाईकांना मनस्ताप भोगावा लागला नसता. स्मार्ट पुलिसिंगच्या मागे धावणाºया नागपूर पोलिसांचा हा हायटेक नेभळटपणा म्हणायचा की काय, असा सवाल चर्चेला आला आहे.