उमठा येथे विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:49+5:302021-05-09T04:09:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नजीकच्या उमठा (ता. नरखेड) येथे काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांना गृहविलगीकरणात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : नजीकच्या उमठा (ता. नरखेड) येथे काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात असून, त्यांनी या काळात गावात फिरू नये व संक्रमण वाढवू नये, यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व जलभूमी फाऊंडेशनने संयुक्तरीत्या पुढाकार घेत गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला आहे. या कक्षाची क्षमता ही ४५ रुग्णांची आहे.
गावातील काेराेनाबाधितांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, काहींच्या घरी स्वतंत्र खाेल्या नाही तर काही संक्रमित कुणाचेही ऐकत नाही. अशा परिस्थितीत काेराेना रुग्ण कुटुंबीयांच्या व इतरांच्या संपर्कात येत असल्याने संक्रमण वाढत आहे. ही साखळी ताेडण्यासाठी गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात गावातील काेराेना संक्रमितांना ठेवण्यात आले आहे. त्यांना चहा, नाश्ता, जेवण, पिण्यास काेमट पाणी, वाफारा, औषधे यासह अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत. यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. आराेग्य विभागाचे कर्मचारी व आशासेविका या रुग्णांची नियमित तपासणीदेखील करीत असल्याचे काही रुग्णांनी सांगितले.
...
३१ रुग्ण, एकाचा मृत्यू
उमठा येथे सध्या काेराेनाचे ३१ रुग्ण आहेत. शिवाय, तीन दिवसापूर्वी येथील एका काेराेनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. काही रुग्णांचा मुक्तसंचार असल्याने गावात संक्रमण वाढत आहे. ते राेखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सर्व रुग्ण या कक्षात देखरेखीखाली राहत असल्याने संक्रमण कमी हाेण्यास मदत हाेणार असल्याचा विश्वासही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.