पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल : विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:48 PM2019-06-04T22:48:14+5:302019-06-04T22:49:57+5:30

राँग साईड वाहन चालवून दोन विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबीचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यशवंत सुखचंद शाहू (वय २५) असे आरोपी जेसीबीचालकाचे नाव आहे. तो पारडी, कळमना येथील रहिवासी आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ.  भूषणकुमार  उपाध्याय यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे कळमना पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून आरोपी शाहूला अटक केली.

Serious cognizance by Police Commissioner : Culpable homicide case registered against JCB driver | पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल : विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल : विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Next
ठळक मुद्देआरोपी वाहनचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राँग साईड वाहन चालवून दोन विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या जेसीबीचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यशवंत सुखचंद शाहू (वय २५) असे आरोपी जेसीबीचालकाचे नाव आहे. तो पारडी, कळमना येथील रहिवासी आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ.  भूषणकुमार  उपाध्याय यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे कळमना पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून आरोपी शाहूला अटक केली.
पृथ्वीराज मनोहर जाधव (वय २१, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, रघुजीनगर) आणि सुशांत सुभाष नागदेवते (वय २५, रा. आदिवासी कॉलनी) तसेच शुभम गुणवंतराव वाघ (वय २०, रा. आदिवासी कॉलनी) हे तीन मित्र रविवारी रामटेकला गेले होते. तेथील मित्रांसोबत गडमंदिर दर्शन आणि दिवसभर गंमतजंमत केल्यानंतर रात्री त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने रामटेकवरून नागपुरात परत येत होते. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर मार्गावरील शेंद्रे ढाब्यासमोर चुकीच्या दिशेने वेगात जेसीबी (एमएच ३४/ एल ६६७९) चालविणाऱ्या आरोपी शाहू याने सुशांतच्या हॉरनेट स्पोर्ट बाईक (एमएच ४९/एएक्स ३२९५)ला जोरदार धडक मारली. त्यामुळे स्पोर्ट बाईक चक्काचूर झाली आणि पृथ्वीराज तसेच सुशांतचा करुण अंत झाला तर शुभम गंभीर जखमी झाला होता. या अपघात प्रकरणात कळमना पोलिसांनी शिवराज रणजित जाधव (वय २४, रा. वकीलपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जेसीबी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आरोपीच्या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. जेसीबीसारखे अवजड वाहन आरोपी शाहू राँग साईड (चुकीच्या बाजूने) चालवित होता. त्यात अत्यंत निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात तो जेसीबी चालवित होता. त्याच्या निष्काळजीपणामुळेच दोन विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी कळमना पोलिसांना आरोपी शाहूविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कळमना पोलिसांनी आरोपी शाहूविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ तसेच ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
यापुढे असेच होणार
निष्काळजीपणे वाहन चालवून निर्दोष व्यक्तीचा बळी घेणारे वाहनचालक सुसाट वेगाने पळून जातात. पोलिसांच्या हाती लागले तरी अपघाताच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे बेदरकार वाहनचालक निर्ढावतात. त्यांना कायद्याची भीती वाटत नाही. त्यामुळे तो वारंवार अपघात घडवतो. या घडामोडीमुळे मात्र बेदरकार वाहनचालकांवर अंकुश बसण्याची आशा निर्माण झाली आहे. यापुढे राँग साईड वाहन चालवून कुणाचा बळी घेणाऱ्या आरोपी वाहनचालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्यात आरोपीला तातडीने जामीनही मिळत नाही.

Web Title: Serious cognizance by Police Commissioner : Culpable homicide case registered against JCB driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.