अजनी वा खापरी येथे मल्टीमॉडेल हब उभारणार

By admin | Published: March 27, 2017 02:18 AM2017-03-27T02:18:46+5:302017-03-27T02:18:46+5:30

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विकासाचे विविध प्रकल्प सुरू आहेत.

Setting up of a multimodel hub at Ajni and Khapri | अजनी वा खापरी येथे मल्टीमॉडेल हब उभारणार

अजनी वा खापरी येथे मल्टीमॉडेल हब उभारणार

Next

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी : केंद्राकडून मिळणार ३०० कोटी
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विकासाचे विविध प्रकल्प सुरू आहेत. लवकरच अजनी किंवा खापरी येथे ‘मल्टीमॉडेल हब’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारक डून ३०० कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित पार्किंग शेडच्या लोकार्पणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या समोरील भागात ५० हजार चौरस फूट जागेत उभारण्यात आलेल्या पार्किंग शेडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
‘मल्टीमॉडेल हब हा रेल्वे, रस्ते व हवाई वाहतुकीचा संयुक्त प्रकल्प राहणार आहे. या प्रस्तावावर विचार सुरू आहे. यात रेल्वे सहभागी झाल्यास अजनी येथील २५० हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाईल, अन्यथा खापरी येथील ३५० ते ४०० हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येईल. यासाठी पाच कंपन्यांना दोन-तीन दिवसात हमी दिली जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, विधायक कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, आशिष देशमुख, सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विमानतळ संचालक रोशन कांबळे, मिहान इंडिया लि.चे सीएमडी विश्वास पाटील, अधीक्षक अभियंता एस.व्ही. चहांदे, वरिष्ठ संचालक विजय मुळेकर, महाव्यवस्थापक आबीद रुही, वरिष्ठ व्यवस्थापक सूरज शिंदे, सहायक व्यवस्थापक राहुल लेंबर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

मध्यवर्ती कारागृहाचे मौदा येथे स्थानांतर
अजनी येथे मल्टीमॉडेल हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यास यासाठी २५० हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. त्यामुळे अजनी येथील मध्यवर्ती कारागृह मौदा येथे स्थलांतरित करण्यात येईल. यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
असे आहे पार्किंग शेड
विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या समोरील जागेत चार कोटींचा खर्च करून भव्य डोम उभारण्यात आला आहे, सोबतच एक पार्किंग शेड उभारण्यात आले आहे. यात प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग बनविण्यात आले आहेत. शेड उभारण्यासाठी इस्त्रायल येथून पॉलिकार्बोनेट शीट माविण्यात आली आहे. त्यामुळे अल्ट्राव्हायलेट किरणे फिल्टर होऊ न आत येतात. परिसरात तीन हॉटेल व आईस्क्र ीम पार्लर आहेत.

Web Title: Setting up of a multimodel hub at Ajni and Khapri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.