नागपुरातील सवई, भंडारी, गुल्हानेंसह राज्यातील सात डॉक्टर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:11 PM2018-09-27T22:11:31+5:302018-09-27T22:14:37+5:30

बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने आरोग्य विभागाचा सात वरिष्ठ डॉक्टरांना गुरुवारी निलंबनाचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली. यात नागपूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश आर. भंडारी व प्रादेशिक मनोरुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.एस. गुल्हाने यांचा समावेश आहे.

Seven doctors of the state including Nagpur's Sawai, Bhandari, Gulhane were suspended | नागपुरातील सवई, भंडारी, गुल्हानेंसह राज्यातील सात डॉक्टर निलंबित

नागपुरातील सवई, भंडारी, गुल्हानेंसह राज्यातील सात डॉक्टर निलंबित

Next
ठळक मुद्देबदलीच्या ठिकाणी रुजू न होण्याचे कारण भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने आरोग्य विभागाचा सात वरिष्ठ डॉक्टरांना गुरुवारी निलंबनाचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली. यात नागपूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश आर. भंडारी व प्रादेशिक मनोरुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.एस. गुल्हाने यांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या सात डॉक्टरांच्या बदल्यांचे आदेश मे व जून महिन्यात आरोग्य विभागाने जारी केले होते. यात नागपूर विभागातील डॉ. योगेंद्र सवई यांची बदली चंद्रपूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी म्हणून करण्यात आली होती. डॉ. कमलेश भंडारी यांची बदली अकोला येथे समान पदावर, तर डॉ. नितीन गुल्हाने यांची बदली बधिरीकरणतज्ज्ञ म्हणून भंडारा जिल्हा रुग्णालयात झाली होती. आदेशात सात दिवसांच्या आत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचा उल्लेख होता. परंतु रुजू होण्यास टाळाटाळ करीत त्याच ठिकाणी कायम राहिले. अखेर २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नागरी सेवा नियम अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करीत शिस्तभंगाची कारवाई करीत शासनाने सातही डॉक्टरांवर तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढले. याचे पत्र गुरुवार २७ सप्टेंबर रोजी संबंधित डॉक्टरांच्या हाती पडताच चर्चेला पेव फुटले. विशेष म्हणजे पत्रात, बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचा उल्लेख नाही किंवा निलंबनाचे कोणतेही कारण देण्यात आले नाही. सुत्रानूसार, या अधिकाऱ्यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त न केल्यामुळेच ते बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याचे सांगण्यात येते.

शासनाच्या आदेशाचे पालन व्हायलाच हवे
शासनाच्या आदेशानंतरही आणि वारंवार स्मरण करून देऊनही बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने राज्यातील सात डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले. शासनाच्या आदेशाचे पालन व्हायलाच हवे. कुणी अधिकारी स्वत:च्या सोयीने काम करीत असेल तर कारवाई नक्कीच होणार.
डॉ. संजीव कांबळे
संचालक, आरोग्य सेवा

Web Title: Seven doctors of the state including Nagpur's Sawai, Bhandari, Gulhane were suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.