सात जुगाऱ्यांना अटक, तीन फरार
By दयानंद पाईकराव | Published: May 20, 2024 03:25 PM2024-05-20T15:25:50+5:302024-05-20T15:26:13+5:30
२.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कारवाई
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट २ ने सोमवारी २० मे रोजी रात्री २.१५ वाजताच्या सुमारास सिताबर्डी ठाण्याच्या हद्दीत मरियमनगर येथे धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींना अटक केली आहे. कारवाईदरम्यान तीन आरोपी फरार झाले असून अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून २ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आशी दिलीपराव काळे (३३, रा. खरबी, वाठोडा), श्रीकांत दिनेश डुमर (२३, रा. साईबाबा नगर, खरबी), आरीफ रियाज खान (२७, रा. सद्भावनानगर, नंदनवन), मयुर मोहन गिरडे २८, रा. लालगंज, पाचपावली), महेन्द्र सुरश शाहु (२९, रा. गजानन चौक), कपिल शेषराव निकोसे (३२, रा. सुळे हायस्कुलजवळ, धंताेली) आणि संतोष गुप्तेश्वर श्रीवास्तव (२९, रा. सुरेन्द्रगड, गिट्टीखदान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कारवाई दरम्यान जुगार अड्डा चालविणारे आरोपी अंकेश तुरकेल, मार्टीन हे दोघे फरार झाले आहेत. तर जुगार खेळणारा वाहन क्रमांक एम. एच. ४९, सी. एच-४१०५ चा चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून रोख ३४ हजार, ६ मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य असा एकुण २ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कलम १२, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.