दोन उपनिरीक्षकांसह सात पोलीस निलंबित

By admin | Published: March 8, 2017 02:27 AM2017-03-08T02:27:17+5:302017-03-08T02:27:17+5:30

दारू, जुगार, मटका अड्ड्यांसह सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करा, असे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे करणाऱ्यांना

Seven policemen suspended with two sub-inspectors | दोन उपनिरीक्षकांसह सात पोलीस निलंबित

दोन उपनिरीक्षकांसह सात पोलीस निलंबित

Next

नागपूर : दारू, जुगार, मटका अड्ड्यांसह सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करा, असे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे करणाऱ्यांना रान मोकळे करून देणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांसह सात पोलिसांना नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी निलंबित केले. मंगळवारी रात्री हे आदेश निघाल्याचे कळाल्यानंतर पोलीस विभागाला भूकंपागत धक्का बसला. निलंबित झालेल्यांमध्ये सावनेर, मौदा आणि खापा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांनी अवैध धंदेवाल्यांसोबत अर्थपूर्ण मैत्री करून त्यांना रान मोकळे करून दिल्याने गावागावात दारूचे गुत्ते, जुगार अड्डे, मटका अड्डे, अवैध प्रवासी वाहतूक, वाळू तस्करी, कोळसा तस्करी बिनबोभाट सुरू आहे. अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीही वाढली आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी २० जानेवारी २०१७ ला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशाची अवहेलना झाली किंवा कुणाच्या कार्यक्षेत्रात कोणतेही अवैध धंदे आढळल्यास संबंधित बीटच्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बलकवडे यांनी दिला होता. मात्र, खाबुगिरीला चटावलेल्या अनेक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी ठिकठिकाणी अवैध धंदे सुरूच राहिले. ते लक्षात आल्यामुळे १ मार्चपासून बलकवडे यांनी परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कदम यांना

पोलीस दलात खळबळ
निलंबित करण्यात आलेल्यांमधील रामआसरे मिश्रा या एएसआयला उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल २०१५-१६ मध्ये राष्टपती पदक मिळाले आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षात अशा प्रकारे एकसाथ सात जणांना निलंबित करण्याची कारवाई नागपूर जिल्हा पोलीस विभागात झाली नव्हती. त्यामुळे आजच्या कारवाईमुळे जवळपास सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Seven policemen suspended with two sub-inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.