नागपुरात सात परिसर सील, सात कोरोना मुक्त, दोघांची सीमावाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:01 AM2020-07-03T01:01:56+5:302020-07-03T01:05:08+5:30
शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात वाढ होत आहे. गुरुवारी यात पुन्हा सात परिसराची भर पडली. तर सात परिसर प्रतिबंध मुक्त झाले असून दोन परिसराच्या प्रतिबंधित सीमा क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात वाढ होत आहे. गुरुवारी यात पुन्हा सात परिसराची भर पडली. तर सात परिसर प्रतिबंध मुक्त झाले असून दोन परिसराच्या प्रतिबंधित सीमा क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
शहरातील लकडगंज झोन क्रमांक ८ अंतर्गत प्रभाग क्रमांक २४ येथील मिनिमातानगर, मंगळवारी झोन क्रमांक १० अंतर्गत प्रभाग क्रमांक ११ येथील झिंगाबाई टाकळी, एसआरए इमारत आणि धंतोली झोन क्रमांक ४ येथील प्रभाग क्रमांक ३३ येथील विलासनगर, रामेश्वरी, आसीनगर झोन ९ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ येथील विनोबा भावेनगर गल्ली नंबर १, तसेच पांडे वस्ती गल्ली नंबर ६, गांधी झोन महाल क्रमांक ६ अंतर्गत प्रभाग क्रमांक २२ येथील क्वेटा कॉलनी, श्री स्वामी नारायण अपार्टमेंट तसेच इतवारी भाजीमंडी, जगदीश हलवाई या परिसरात कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे हे परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहे. या परिसरात कुणीही व्यक्ती प्रवेश अथवा बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ, कोविड-१९ संदर्भातील शासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.
तर, लकडगंज झोन क्रमांक ८ अंतर्गत प्रभाग क्रमांक २४ येथील मिनिमातानगर, पाच झोपडा व गांधी झोन महाल अंतर्गत बाजार चौक, उपाध्ये रोड येथील सीमा क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे.
प्रतिबंधित मुक्त परिसर
सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत स्विपर कॉलनी लालगंज, विनाकी सोनार टोली, सतरंजीपुरा.
लक्ष्मीनगर झोन क्रमांक १ अंतर्गत बजाजनगर
धंतोली झोन क्रमांक ४ अंतर्गत चंद्रमणीनगर
धरमपेठ झोन अंतर्गत धंतोली एस.के. बॅनर्जी मार्ग (पोस्ट आॅफीस)
गांधी झोन महाल अंतर्गत गांधीबाग कपडा मार्केट.
नवे प्रतिबंधित क्षेत्र
नव्या प्रतिबंधित क्षेत्रात अनुक्रमे मिनिमातानगर, मनपा शाळा येथील उत्तरेस प्रदीप फुलझेले ते भगवान भोले यांचे घर, पूर्वेस प्रदीप फुलझेले ते मनपा शाळा भिंत, दक्षिणेस मनपा शाळा भिंत, पश्चिमेस भगवान भोले ते संत धासीदास भवन भिंत.
झिंगाबाई टाकळी, एसआरए इमारत दक्षिण-पश्चिमेस विनोद खरे यांचे घर, उत्तर-पश्चिमेस गोदावरी किराणा स्टोअर्स, उत्तर-पूर्वेस अनिल ढोले यांचे घर, दक्षिण-पूर्वेस खंडेश्वर यांचे घर तसेच विलासनगर, रामेश्वरी, उत्तर-पश्चिमेस राजो किराणा, उत्तर-पूर्वेस संजय सावरकर यांचे घर, दक्षिण-पूर्वेस नंदाजी महाराज मठ, दक्षिण-पश्चिमेस भीमराव राऊत, विनोबा भावेनगर गल्ली नंबर १ येथील दक्षिण-पूर्वेस यश मोबाईल शॉप, उत्तर-पूर्वेस दिलीप नामदेव सुटे यांचे घर, उत्तर-पश्चिमेस शिवकुमार धकाते यांचे घर आणि दक्षिण-पश्चिमेस सेवा श्री बँक, क्वेटा कॉलनी, श्री स्वामी नारायण अपार्टमेंट येथील दक्षिण-पश्चिमेस न्य ईरा हॉस्पिटल, उत्तर-पश्चिमेस सायक्लोन बुटीक, उत्तर-पूर्वेस रिद्धीसिद्धी फास्ट फूड चाट पॉईंट तर दक्षिण-पूर्वेस तायबा टिंबर मार्ट, पांडे वस्ती गल्ली नंबर ६ येथील दक्षिण-पूर्वेस शिल्पा नंदू गायकवाड यांचे घर, उत्तरेस एस.एन.के. इंजिनिअरिंग, उत्तर-पश्चिमेस दिलीप गुप्ता यांचे घर तर दक्षिण-पश्चिमेस शब्बीर खान यांचे घर तर इतवारी भाजी मंडी, जगदीश हलवाई जवळ येथील उत्तर-पश्चिमेस अनिकेत कलेक्शन, उत्तर-पूर्वेस चेरी फॅशन, दक्षिण-पूर्वेस संस्कार भवन आणि दक्षिण-पश्चिमेस पराग एजन्सीचा समावेश आहे.