धम्मचक्र प्रवर्तन दिन; दीक्षाभूमीवर पहिल्याच दिवशी सात हजारांवर अनुयायांनी घेतली दीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2022 07:47 PM2022-10-03T19:47:50+5:302022-10-03T19:48:21+5:30

Nagpur News दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरेई ससाई व त्यांच्या भिक्खू संघाने पहिल्याच दिवशी ७ हजारांवर अनुयायांना धम्मदीक्षा दिली.

Seven thousand followers took initiation on the very first day at Diksha Bhoomi | धम्मचक्र प्रवर्तन दिन; दीक्षाभूमीवर पहिल्याच दिवशी सात हजारांवर अनुयायांनी घेतली दीक्षा 

धम्मचक्र प्रवर्तन दिन; दीक्षाभूमीवर पहिल्याच दिवशी सात हजारांवर अनुयायांनी घेतली दीक्षा 

googlenewsNext
ठळक मुद्दे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई व भिक्खू संघाने दिली दीक्षा

नागपूर : ६६वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरेई ससाई व त्यांच्या भिक्खू संघाने पहिल्याच दिवशी ७ हजारांवर अनुयायांना धम्मदीक्षा दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो बांधवांना दीक्षा दिली होती. त्यामुळे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. या दिनाचे औचित्य साधून भदंत ससाई मागील अनेक वर्षांपासून धम्मदीक्षा देत आहेत. आतापर्यंत लाखो बांधवांना दीक्षा दिली आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष दीक्षाभूमीवर धम्म दीक्षा सोहळा होऊ शकला नाही. यंदा कोरोनामुक्त वातावरण आणि कोणतेही प्रतिबंध नसल्यामुळे मुख्य सोहळ्यासाठी बौद्ध उपासक-उपासिका, धम्म बांधव आणि अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीवर येणार आहेत.

यातील बहुतांश बांधव सोहळ्यासह धम्म दीक्षा घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे भदंत ससाई यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर तीन दिवस धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भिक्खू संघाचे भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश, भदंत नागसेन, भदंत प्रज्ञा बोधी, भदंत धम्म विजय, भदंत महानाग, भदंत धम्मप्रकाश, भदंत मिलिंद, भदंत धम्मबोधी, भदंत नागाप्रकाश, भदंत महाकश्यप आदींच्या उपस्थित दीक्षा सोहळा ३ ऑक्टोबर रोजी सकाळपासून सुरू झाला. यात दिवसभरात ७ हजारांवर अनुयायांना धम्मदीक्षा दिली. धम्म दीक्षा दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रही वितरित करण्यात आले.

Web Title: Seven thousand followers took initiation on the very first day at Diksha Bhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.