नागपुरात सात वर्षीय मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 09:25 PM2019-06-15T21:25:25+5:302019-06-15T21:26:40+5:30

पुतणीसोबत खेळायला येणाऱ्या एका सात वर्षीय मुलीवर शेजारच्या एका नराधमाने दोन आठवड्यात अनेकदा अत्याचार केला. तिने गप्प राहावे म्हणून तिच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. मात्र, त्याच्या अत्याचारामुळे मुलीला असह्य वेदना झाल्याने शुक्रवारी त्याचे पाप चव्हाट्यावर आले आणि मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या बांधल्या. रविकांत देवराव हाडके (वय ३०) असे त्याचे नाव आहे.

A seven-year-old girl raped in Nagpur | नागपुरात सात वर्षीय मुलीवर बलात्कार

नागपुरात सात वर्षीय मुलीवर बलात्कार

Next
ठळक मुद्देवारंवार अत्याचार, आईवडिलांना मारण्याची धमकी : एमआयडीसीत गुन्हा, नराधम गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुतणीसोबत खेळायला येणाऱ्या एका सात वर्षीय मुलीवर शेजारच्या एका नराधमाने दोन आठवड्यात अनेकदा अत्याचार केला. तिने गप्प राहावे म्हणून तिच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. मात्र, त्याच्या अत्याचारामुळे मुलीला असह्य वेदना झाल्याने शुक्रवारी त्याचे पाप चव्हाट्यावर आले आणि मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या बांधल्या. रविकांत देवराव हाडके (वय ३०) असे त्याचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आरोपी हाडके कॉम्प्युटर ऑपरेटर असून, तो देवनगर, खामल्यातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. त्याच्या शेजारीच पीडित मुलीचा परिवार राहतो. हाडकेला पीडित मुलीच्या वयाची पुतणी आहे. त्यामुळे पीडित मुलगी त्याच्या पुतणीसोबत नेहमी खेळायला यायची. २० मेच्या दिवशी पीडित मुलगी अशाच प्रकारे तिच्या मैत्रिणीकडे खेळायला आली असताना नराधम हाडकेने तिला वस्ती जवळच्या गार्डनमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना ठार मारेन, अशी या नराधमाने धमकी दिली. त्यामुळे दहशतीत आलेल्या मुलीने गप्प राहणे पसंत केले. आपल्या पापाची वाच्यता होत नसल्याचे पाहून नराधम हाडकेने नंतर पीडित मुलीसोबत दुसऱ्यांदा कुकृत्य केले. ३ जूनला त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे मुलीला वेदना होऊ लागल्या. तिने शुक्रवारी आईला हा प्रकार सांगितला. आईने तिची पाहणी केली आणि मुलीला विचारणा केली असता नराधम हाडके तिचे शोषण करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली हाडकेविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.
पाच दिवसांची कोठडी
नराधम हाडके विवाहित असून, त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती आहे. पीडित मुलगी त्याला काका म्हणायची. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रारंभी गुन्हा केल्याचा इन्कार केला. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्याची पाच दिवसांची कोठडी मिळवली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: A seven-year-old girl raped in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.