अन् लोकमत भवनच्या सातव्या माळ्यावर लागली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 09:10 PM2020-12-31T21:10:00+5:302020-12-31T21:11:54+5:30

Mock drill Lokmat Bhavan, लोकमत भवन मधील सातव्या माळ्यावर गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास अचानक आग लागते. लगेच सायरन वाजवून इमारतीमधील लोकांना सतर्क केले जाते.

At the seventh floor of Lokmat Bhavan ... | अन् लोकमत भवनच्या सातव्या माळ्यावर लागली...

अन् लोकमत भवनच्या सातव्या माळ्यावर लागली...

googlenewsNext
ठळक मुद्देअग्निशमन विभागाची मॉकड्रील : टीटीएलच्या सायरनमुळे परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकमत भवन मधील सातव्या माळ्यावर गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास अचानक आग लागते. लगेच सायरन वाजवून इमारतीमधील लोकांना सतर्क केले जाते. आग लागल्याची सूचना महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळते आणि अवघ्या पाच मिनिटात टीटीएल घटनास्थळी पोहचते. काही क्षणात टीटीएलच्या शिडीने सातव्या माळ्यावर आगीत सापडलेल्यांना सुखरुप बाहेर काढले जाते. त्याचवेळी अ‍ॅम्ब्युलन्स येते आणि जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. अवघ्या १० मिनिटात आगीत अडकलेल्यांना मदत मिळते. याची अग्निशमन विभागातर्फे लोकमत भवन येथे मॉकड्रील घेण्यात आली.

शहरातील उंच इमारतीत आग लागली तर तात्काळ आग आटोक्यात आणून लोकांचे जीव कसे वाचावे यासाठी हे प्रात्यक्षिक होते. अग्निशमन विभागातर्फे आपात्कालीन स्थितीत यंत्रणा सज्ज आहे की नाही, तपासण्यासाठी असे मॉकड्रील घेण्यात येते. अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात मॉकड्रील करण्यात आली. स्टेशन आफिसर तुषार बाराहाते, राजेंद्र दुबे, सेवानिवृत्त केशव कोठे यांच्यासह अग्निशमन विभागातील अनिल बालपांडे, तुषार नेवारे, गणेश राजूरकर, शैलेश पाटील व विभागातील जवान सहभागी झाले होते.

आगीत अडलेल्या सुखरूप काढले

लोकमत भवनच्या सातव्या माळ्यावर आग लागते. इमारतीची लिफ्ट आगीमुळे बंद असते. अशा स्थितीत आगीत अडकलेल्यांचा बचाव कसा करायचा, याचा सराव करण्यात आला. प्रात्यक्षिकात आग लागल्यानंतर अडकलेल्यांना टीटीएलच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहचविण्यात आले.

मॉकड्रील असले तरी प्रत्यक्ष वाटावे, असा सराव यावेळी करण्यात आला. अग्निशमन जवानाच्या मदतीने परिसर सील करण्यात आला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. १५ ते २० मिनिटात मॉकड्रील संपली.

Web Title: At the seventh floor of Lokmat Bhavan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.