नागपूर मनपातील ११५३७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:00+5:302020-12-09T04:07:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू आदेश मंगळवारी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू आदेश मंगळवारी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील ११ हजार ५३७ कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा लाभ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१९ पासून १५ महिन्याचे अरिअर्स मिळणार आहे. प्रत्येकी ४ ते ६ लाखांच्या आसपास राहणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनपा कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावण आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला ८ ते १० कोटींचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.
डिसेंबर पेड इन जानेवारी पासून वाढीव वेतन मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४ ते १५ हजार रुपये वाढ होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. मात्र नगरविकास विभागाने याबाबतचा निर्णय न घेतल्याने मनपा कर्मंचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाला नव्हता.
मुंबई येथे मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर महापालिकेला सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले याप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालक मंत्री डॉ नितीन राऊत,मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे नगरसेवक प्रफुल गुडधे, संघटनेचे सुरेंद्र टिंगणे ,रंजन नलोडे ,ईश्वर मेश्राम ,प्रवीण तंत्रपाळे, बाबाराव तंत्रपाळे ,अरुण तुर्केल ,कुणाल मोटघरे, बाबाराव श्रीखंडे आदी उपस्थित होते.