पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्याचे मतदान आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:20+5:302021-04-26T04:07:20+5:30
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या सातव्या टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढला असताना, किती मतदार ...
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या सातव्या टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढला असताना, किती मतदार मतदान केंद्रांपर्यंत जातात, याची चिंता राजकीय पक्षांना सतावते आहे. आतापर्यंतच्या सर्व टप्प्यांत अपेक्षेपेक्षा जास्त मतदान दिसून आले.
सातव्या टप्प्यात ३४ जागांवर मतदान होणार असून २८४ उमेदवार रिंगणात आहेत. कोलकाता, दक्षिण दिनाजपूर, मालदा, मुर्शिदाबाद व पश्चिम बर्दवान या जिल्ह्यांतील या जागा आहेत. अगोदरच्या टप्प्यांमधील हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता, सोमवारी केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुमारे ८०० तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मतदानादरम्यान कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
असा आहे सातवा टप्पा...
जागा - ३४
उमेदवार - २८४
मतदान केंद्रे - १२,०६८
मतदार - ८१,९६,२४२