सेक्स रॅकेटचा छडा

By admin | Published: December 23, 2015 03:32 AM2015-12-23T03:32:35+5:302015-12-23T03:32:35+5:30

अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात मोठ्या प्रमाणात सेक्स वर्कर्सना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या सांगली ...

Sex racket | सेक्स रॅकेटचा छडा

सेक्स रॅकेटचा छडा

Next

मुंबईची वारांगना : सांगली, नांदेडमधील दलाल
नागपूर : अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात मोठ्या प्रमाणात सेक्स वर्कर्सना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या सांगली तसेच नांदेडमधील दलालांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांनी आणलेल्या मुंबईच्या एका वारांगनेसह दोघींना ताब्यात घेऊन नंतर त्यांची पोलिसांनी मुक्तता केली. दिलीप शिवाजी गुळवे (सांगली), प्रकाश किसन पवार (कंधार, नांदेड) आणि हिरालाल शंकर गुप्ता (कळमना) अशी हे सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांची नावे आहेत.

ंअनेक जणी पळाल्या
ताब्यात घेतलेल्या या वारांगनाकडून दर दिवशी १० ते २० हजार रुपये उपरोक्त आरोपी कमवित होते. त्यांच्याकडे मुंबई, पुण्याच्या अन्य काही वारांगना होत्या. कारवाईनंतर त्या पळून गेल्याचे समजते. पोलीस या आरोपींची चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात होणारी गर्दी लक्षात घेत अशा प्रकारे अनेक ठिकाणचे दलाल येथे आले असून, त्यांनी देशातील अनेक प्रांतातून वारांगनांनाही येथे बोलविल्याची माहिती आहे.

दिलीप गुळवे विक्रांत एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवितो, अशी माहिती गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. तो इंटरनेटच्या माध्यमातून ठिकठिकाणच्या सेक्स वर्कर आणि ग्राहकांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले. आरोपी गुळवे काही दिवसांपासून नागपुरात वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची खात्री झाल्यामुळे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, दीपाली मासिरकर यांच्या निर्देशानुसार, सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक दीपककुमार खोब्रागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला.
उपरोक्त आरोपींसोबत पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संपर्क साधला. त्याने ग्राहकाला त्रिशरण चौकाजवळ (प्रतापनगर) रचना अपार्टमेंटमध्ये बोलविले. एक तरुणी दोन हजारात उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. पोलिसांनी पाठविलेल्या ग्राहकासोबत वारांगना सदनिकेच्या आतमध्ये गेली. त्यानंतर काही वेळेने एपीआय अमिता जयपूरकर, सुनीता पाटील, वाय. एस. चौधरी, हवालदार गोपाळ वैद्य, स्मिता पाटील, मनोज सिंग आणि संजय पांडेचे पथक तेथे धडकले. त्यांनी बनावट ग्राहकासोबतची वारांगना, दुसरी एक तसेच गुळवे, पवार आणि गुप्ताला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Sex racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.