उपराजधानीत सेक्स रॅकेट; रशियन बालेसह तिघी सापडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 11:13 AM2019-09-30T11:13:33+5:302019-09-30T11:15:48+5:30

उपराजधानीत देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला.

Sex racket in the subcontinent; The trio were found with Russian girl | उपराजधानीत सेक्स रॅकेट; रशियन बालेसह तिघी सापडल्या

उपराजधानीत सेक्स रॅकेट; रशियन बालेसह तिघी सापडल्या

Next
ठळक मुद्देसोनारकरचे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडएसएसबीचा कुंटणखान्यावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला. या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या पॉश कुंटणखान्यावर छापा मारून सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) एका रशियन बालेसह तिघींना ताब्यात घेतले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरनगरात असलेल्या डीके लॉज अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये शनिवारी एसएसबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.
सचिन सोनारकर हा या गोरखधंद्यातील सराईत गुन्हेगार असून तो अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवितो. त्याच्याकडे देश-विदेशातील शेकडो वारांगनांची यादी असून तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना बोलवून घेतो. सोनारकरकडे आंबटशौकिन धनिक मंडळी, बुकींचीही मोठी यादी असून या ग्राहकांना तो पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या महानगरातील वारांगना उपलब्ध करून देतो. सचिनच्या वेगवेगळ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी अनेकदा छापा मारला असून, कारवाई केली आहे. त्याने आता कोतवालीत दीपेश कानाबारच्या मदतीने डीके लॉज अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये पॉश कुंटणखाना सुरू केल्याची माहिती कळल्यानंतर एसएसबीचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी सापळा रचून आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी सायंकाळी तेथे छापा मारला. पोलिसांना तेथे तीन वारांगना आढळल्या. त्यातील एक रशियन (किरगिझस्तान), दुसरी आसाम तर तिसरी रायपूर, छत्तीसगडची आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा कुंटणखाना चालविण्यास सोनारकर आणि कानाबारला मदत करणारे अंकित किशोर वाहने (वय १९, रा. भांडे प्लॉट), राजेश हरिश्चंद्र गोखे (वय ३५, रा, बापूकुटीनगर, पाचपावली) यांनाही एसएसबीने सहआरोपी केले.

सारेच अचंबित करणारे !
कुख्यात सचिन सोनारकर ज्या पद्धतीने हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवितो, ती पद्धत अचंबित करणारी आहे. तो देश-विदेशातील अनेक महागड्या वारांगनांच्या, मोठमोठ्या हॉटेल, लॉज, रिसॉर्टच्या संचालकांच्याही संपर्कात आहे. तो वारांगनांना विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो, बोलवतो. धनिक मंडळींच्या सांगण्यानुसार त्यांची आलिशान हॉटेलमध्ये व्यवस्था करतो. त्यांना इकडून तिकडे पोहचवण्यासाठी आलिशान कारची व्यवस्था करतो. भ्रष्ट पोलिसांनाही मागेल ती किंंमत देऊन तो त्यांचे तोंड बंद करतो. म्हणून सोनारकरसोबत अनेकजण मधूर संबंध ठेवतात. सोनारकरने ‘यापूर्वी एसएसबीत असलेल्या (सध्या नाही) एका पोलीस अधिकाऱ्याच्या नाकात नोटा आणि सीडीची बेसर’ टाकली होती. त्याचमुळे बेसर घातलेला अधिकारी सोनारकरवर कारवाई न करता त्याच्याकडून पाहिजे ते मागून घेत होता.

Web Title: Sex racket in the subcontinent; The trio were found with Russian girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.