नागपुरात तृतीयपंथीयाने केले लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:17 PM2020-09-21T22:17:37+5:302020-09-21T22:19:09+5:30
तृतीयपंथीयाने आर्किटेक्ट युवतीला ब्लॅकमेल करून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तृतीयपंथीयाने आर्किटेक्ट युवतीला ब्लॅकमेल करून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी मनीष (३२) हा हिंगण्यामध्ये राहतो. तर पीडित २२ वर्षांची युवती आर्किटेक्ट आहे. तिची वर्षभरापूर्वी मनीषसोबत गरबामध्ये ओळख झाली. मनीषच्या भाच्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याने फेब्रुवारीत तिला आपल्या घरी बोलाविले. त्याने तिची कुटुंबीयांशी ओळख करून दिली. युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार भोजनानंतर कोल्डड्रिंक घेतल्यावर तिला झोप येत होती. झोप येत असल्यामुळे मनीषच्या आईने तिला आपल्या मुलीच्या खोलीत झोपण्यास सांगितले. दीड तासानंतर झोपेतून जागे झाल्यानंतर तिला त्रास होत होता. त्यानंतर तिचे मनीषसोबत बोलणे सुरू होते. मनीषने तिला प्रपोज केल्यानंतर त्यांच्यात मित्रता झाली. एका दिवशी ती मनीषच्या हिंगणा येथील कार्यालयात गेली. तेथे तुषार घागरे उपस्थित होता. मनीषने तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने नकार दिल्यानंतर मनीषने व्हिडिओ क्लिप दाखविली. ही क्लिप त्याने मनीषच्या घरी गेल्यानंतर आणि कोल्डड्रिंक पाजल्यानंतर बनविली होती. व्हिडिओ क्लिप पाहून तिला धक्का बसला. मनीषने शारीरिक संबंध ठेवल्यानंतरच ती क्लिप डिलिट करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तो आपल्या कार्यालयात सेक्स टॉयच्या मदतीने तिच्याशी शारीरिक संबंध करीत होता. एप्रिलमध्ये युवतीला तो तृतीयपंथी असल्याची माहिती मिळाली. मनीषकडे व्हिडिओ क्लिप असल्यामुळे तिला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागले. नुकतेच युवतीचे लग्न ठरले आहे. त्याची माहिती मिळाल्यामुळे मनीष चिडला. त्याने तिला तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. साखरपुडा झाल्यानंतर मनीष तिच्या होणाऱ्या पतीच्या घरी पोहोचला. त्याने तिच्या होणाºया पतीला फोटो दाखवून आमचे नाते असल्याची माहिती दिली. युवती कुटुंबीयांसोबत त्याला समजविण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्यामुळे चिडलेल्या मनीष आणि तुषार घारगे यांनी युवतीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. युवतीने मनीष आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनीषविरुद्ध अनैसर्गिक कृत्य, धमकी देणे तसेच बदनामी करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या मते, व्हिडिओ क्लिप तयार करणे तसेच ब्लॅकमेल करण्यात सर्वच समाविष्ट आहेत. पोलिसांनी सध्या मनीषलाच आरोपी केले आहे.