लैंगिक अत्याचार करणाऱ्याची तुरुंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:30+5:302021-06-30T04:07:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : वर्गमैत्रिणीशी आधी प्रेमसंबंध व नंतर लग्न करण्याची बतावणी करीत शरीरसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर वारंवार ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : वर्गमैत्रिणीशी आधी प्रेमसंबंध व नंतर लग्न करण्याची बतावणी करीत शरीरसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. २९) १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी (एमसीआर) सुनावली आहे. दाेन दिवसाचा पाेलीस काेठडी काळ संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले हाेते.
वैभव कैलास राऊत, रा. नवेगाव (चिचदा, ता. रामटेक) असे आराेपीचे नाव आहे. त्याने त्याच्या वर्गमैत्रिणीशी प्रेमसंबंध जुळवून तिला विश्वासात घेत लग्नाचे आमिष दाखविले आणि वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. तिने लग्न करण्यासाठी तगादा लावताच त्याने तिला शिवीगाळ केली. त्याला पाेलिसांनीही समजावून सांगितले. मात्र, त्याने लग्न करण्याचे टाळले. तिने पाेलिसात तक्रार दाखल करताच वैभव २२ दिवस फरार राहिला. त्याला साकाेली (जि. भंडारा) येथे अटक करण्यात आली.
जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दाेन दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली हाेती. हा काळ संपल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले हाेते. त्यामुळे न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावल्याने त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
...
राजकीय दबावाचा वापर
वैभव २२ दिवस फरार हाेता. या काळात न्यायालयाने त्याचा दाेनदा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. शिवाय, त्याचे वडील राजकीय पक्षाचे पदाधिकारी व बाेथिया पालाेरा भागाचे लाेकप्रतिनिधी असल्याने प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी पाेलीस अधिकाऱ्यांवर राजकीय दबावदेखील आणला हाेता.