नागपुरात शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:07 PM2018-05-05T16:07:51+5:302018-05-05T16:08:14+5:30

आॅटोचालकाने दोन वर्षांपासून एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र पांडुरंग ससाने (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली.

Sexual harassment of school children in Nagpur | नागपुरात शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण

नागपुरात शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण

Next
ठळक मुद्देआईवडिलांना जीवे मारण्याची धमकी : आरोपी आॅटोचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आॅटोचालकाने दोन वर्षांपासून एका शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र पांडुरंग ससाने (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली.
पीडित मुलगा १३ वर्षांचा आहे. हा मुलगा आणि आरोपी आॅटोचालक सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वावलंबीनगरात राहतात. मुलाला दोन ते तीन वर्षांपासून शाळेत नेण्याचे आणि शाळेतून घरी आणण्याचे काम आरोपी आॅटोचालक ससाने करायचा. १ जुलै २०१६ ला शाळेतून परत येत असताना आरोपी ससाने याने निर्जन ठिकाणी आॅटो उभा करून पीडित मुलावर अत्याचार केला. यावेळी त्याला ससानेने धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. मुलगा भीतीमुळे गप्प राहिला. त्यामुळे आरोपी ससाने निर्ढावला. पुढे तो मनात येईल तेव्हा पीडित बालकाचे लैंगिक शोषण करू लागला. कधी वडिलांना, कधी आई तर कधी बहिणीला जीवे ठार मारेन, अशी धमकी देऊन तो पीडित मुलावर अत्याचार करीत होता. त्याने विरोध केल्यास तो त्याला मारहाण करायचा. तब्बल दोन वर्षांपासून त्याचा हा अत्याचार पीडित बालक सहन करीत आहे. ११ एप्रिलला त्याने अशाच प्रकारे मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. विरोध केला असता मारहाण केली. त्याच्या पाशवी अत्याचाराने मुलाला जखम होऊन रक्तस्राव झाला. त्याची प्रकृती बिघडल्याने पालकांनी त्याला खासगी इस्पितळात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पीडित बालकाला विचारणा केली असता त्याने आपली कैफियत सांगितली. आईवडिलांना आरोपी जीवे मारण्याचा धाक दाखवत असल्याने गप्प होतो, असेही स्पष्ट केले. डॉक्टरांनी ही बाब बालकाच्या पालकांना सांगितली. त्यानंतर ही संतापजनक घटना उजेडात आली. पालकांनी त्याला शनिवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात नेले. बालकाने दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
 

Web Title: Sexual harassment of school children in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.