शरीरसंबंधास अल्पवयीन मुलीच्या सहमतीला अर्थ नाही; न्यायालयाचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 02:19 PM2022-02-04T14:19:47+5:302022-02-04T14:20:02+5:30
कायद्यानुसार अल्पवयीन मुलीच्या सहमतीला अर्थ नाही.
नागपूर : अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून अर्थ नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले व आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निर्णय दिला.
पीर मोहम्मद घोटू मोहम्मद इस्माईल (२३) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी व पीडित मुलीचे एकमेकांवर प्रेम होते. मुलगी स्वत:हून आरोपीसोबत पळून गेली व तिने सहमतीने शरीरसंबंध ठेवले, असा युक्तिवाद करून जामीन मागण्यात आला होता. कायद्यानुसार अल्पवयीन मुलीच्या सहमतीला अर्थ नाही. याशिवाय आरोपी तिच्यावर प्रेम करण्यासाठी दबाव टाकत होता. आरोपीने मुलीच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती आरोपीसोबत पळून गेली. वैद्यकीय पुराव्यांवरून आरोपीने बलात्कार केल्याचे दिसून येते, असे न्यायालयाने स्पष्ट करून जामीन नाकारला.