हायटेंशन लाइनखाली असलेल्या झोपड्या हटविल्या, विद्युत खांबावर विनापरवानगी बॅनरविरोधात कारवाई

By मंगेश व्यवहारे | Published: April 18, 2023 12:47 PM2023-04-18T12:47:48+5:302023-04-18T12:49:04+5:30

धरमपेठ झोनअंतर्गत गोकुळपेठ बाजार ते शंकरनगर चौकपर्यंत अतिक्रमणची कारवाई

Shacks under high tension line removed, action taken against unauthorised banners on electric poles | हायटेंशन लाइनखाली असलेल्या झोपड्या हटविल्या, विद्युत खांबावर विनापरवानगी बॅनरविरोधात कारवाई

हायटेंशन लाइनखाली असलेल्या झोपड्या हटविल्या, विद्युत खांबावर विनापरवानगी बॅनरविरोधात कारवाई

googlenewsNext

नागपूर : नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या सदाशिवनगर वाठोडा जुनी वस्ती येथे हायटेंशन लाइनच्या खाली अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेल्या ४ झोपड्या हटविण्यात आल्या, तर धरमपेठ झोनअंतर्गत गोकुळपेठ बाजार ते शंकरनगर चौकपर्यंत अतिक्रमणची कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ३४ अतिक्रमण काढून दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सोमलवाडा येथील सार्वजनिक जागेवर बांधण्यात आलेले ४ अनधिकृत झोपड्या तोडण्यात आल्या.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी नरेन्द्र नगर येथील एका शाळेवर कारवाई केली. या शाळेने रस्त्यावरील विद्युत खांबावर विना परवानगीने बॅनर लावले होते. त्यांच्याकडून ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मानकापूर येथील राधे इन्स्टिट्यूटविरुध्द रस्त्यालगत विद्युत खांबावर विना परवानगीने डिस्प्ले बॅनर लावल्यामुळे ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Shacks under high tension line removed, action taken against unauthorised banners on electric poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.