नागपूर विद्यापीठाच्या शादाब पठाणचा स्पर्धा विक्रम; अ.भा. आंतरविद्यापीठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप

By आनंद डेकाटे | Published: March 16, 2023 01:50 PM2023-03-16T13:50:01+5:302023-03-16T13:52:14+5:30

शादाब पठाण ने नव्या स्पर्धा विक्रमाची नोंद केली

Shadab Pathan of Nagpur University's makes record in Akhil Bhartiya Inter-University Athletics Championship | नागपूर विद्यापीठाच्या शादाब पठाणचा स्पर्धा विक्रम; अ.भा. आंतरविद्यापीठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप

नागपूर विद्यापीठाच्या शादाब पठाणचा स्पर्धा विक्रम; अ.भा. आंतरविद्यापीठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप

googlenewsNext

नागपूर : चेन्नई येथील तामिळनाडू शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विद्यापीठाच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शादाब पठाण ने नव्या स्पर्धा विक्रमाची नोंद केली आहे.

स्पर्धेत सिहोरा येथील कला महाविद्यालयाचा विद्यार्थी शादाबने पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभाग नोंदवित अव्वल स्थानासह सुवर्ण पदक आपल्या नावे केले. शादाब पठाण ने स्पर्धेत १३ मिनिटे ५८.४८ सेकंद इतकी वेळ नोंदविली. आत्तापर्यंत झालेल्या या स्पर्धेत शादाबने सर्वात कमी वेळात हे अंतर पार करून नवीन विक्रमाची नोंद केली. यापूर्वी स्पर्धेत हेच अंतर कुरुक्षेत्रच्या प्रिंसने १४ मिनिटे ५.४८ सेकंदाची वेळ नोंदवित गाठले आहे. तर शादाबने ही वेळ मोडत काढत नवीन स्पर्धा रेकॉर्ड तयार केला.

स्पर्धेत रौप्यपदक हरिओम तिवारी याने १४ मिनिटे ६.४७ सेकंद वेळेसह प्राप्त केले. तर कांस्यपदक शिवाजी विद्यापीठाच्या उत्तम पाटील याने १४ मिनिटे ६.८४ सेकंदासह प्राप्त केले. शादाबने मंगळवारी झालेल्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत २९ मिनिटे २८.६५ सेकंद एवढी वेळ नोंदवित चवथे स्थान प्राप्त केले होते. तर महिला गटात प्राजक्ता गोडबोले हिने देखील चवथे स्थान मिळविले होते. शादाबने आपल्या कामगिरीत सुधारणा करीत वैयक्तिकरीत्या आत्तापर्यंतची सर्वोत्तम वेळ नोंदविली होती.

याशिवाय स्पर्धेत अर्ध मॅरेथॉनमध्ये नागपूर विद्यापीठाची स्वाती पंचबुद्धे, प्राजक्ता गोडबोले, लिलाधर बावणे, ३ हजार मीटर स्टीपलचेस मध्ये रोहित झा, सौरव तिवारी, तर महिलांमध्ये रिया दोहतरे सहभागी होणार असून या खेळाडूंकडून विद्यापीठाला पदकाची अपेक्षा असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

Web Title: Shadab Pathan of Nagpur University's makes record in Akhil Bhartiya Inter-University Athletics Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.