हा निर्लज्जपणा आयुष्य उद्ध्वस्त करेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 10:38 AM2019-12-11T10:38:58+5:302019-12-11T10:41:09+5:30

प्रेमीयुगुलांचा सार्वजनिक ठिकाणी होणार प्रणय मर्यादेपलीकडे जात आहे. येथे फिरावयास आलेल्या कुटुंबासमोर विकृत प्रदर्शन नेहमीचे झाले आहे.

shameless acts in public places in Nagpur | हा निर्लज्जपणा आयुष्य उद्ध्वस्त करेल!

हा निर्लज्जपणा आयुष्य उद्ध्वस्त करेल!

Next
ठळक मुद्देकुणी व्हिडिओ करून ब्लॅकमेल करत असेल तर...?सेमिनरी हिल्स, अंबाझरी उद्यानात युगुलांची विकृत धिटाई

सुमेध वाघमारे, मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी, सेमिनरी हिल्स उद्यानात चालणारे अश्लील चाळे म्हणजे हल्लीच्या तरु णाईची विकृत धिटाईच. प्रेम हे प्रेम असते, हे मान्य केले तरी प्रेमीयुगुलांचा सार्वजनिक ठिकाणी होणार प्रणय मर्यादेपलीकडे जात आहे. येथे फिरावयास आलेल्या कुटुंबासमोर विकृत प्रदर्शन नेहमीचे झाले आहे. मुलांच्या खेळणी असलेल्या परिसरापासून ते झाडाझुडपातील युगुलांचे अश्लील चाळे आणि त्यांच्या उत्तान दृश्यांनी मुलामुलींसोबत आलेले कुटुंब अर्धा तासही या उद्यानात थांबत नाही. सार्वजनिक ठिकाणी आपण करीत असलेल्या कृत्याचे त्यांना गैर वाटत नाही. यामुळे त्यांच्यावर नजर ठेवून असणाऱ्या समाजकंटकांच्या मोबाईलमध्ये असे प्रसंग कैद होत आहेत. येथून पुढे ‘ब्लॅकमेलिंग’चे प्रकार होऊन पुढे तिचे-त्याचे आयुष्य उद््ध्वस्त होणार नाही कशावरून?

अश्लील चाळे करताना सेल्फी
तरुण तरुणींचे बेभानपणे अश्लील चाळे सुरू असतात. अशा अवस्थेत ते सेल्फीसुद्धा घेत असतात. ते एकमेकांत इतके गुंतले होते की त्यांना कुणी त्यांचे व्हिडिओ वा फोटो काढत आहेत याचेसुद्धा भान नव्हते. मुलामुलींचे असे व्हिडिओ वा फोटो घेऊन त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत याचीही फिकिर या मुलांना नसल्याचे दिसून आले.

दोषी तरी कुणाला ठरवणार?
बालोद्यानात मंगळवारी आलेल्या बहुतांश तरुण तरुणी या शाळा कॉलेजला बुट्टी मारून आल्या होत्या. त्यांच्याजवळ स्कूल वा कॉलेज बॅग्ज होत्या. आईवडिलांनी त्यांना दुचाकीही घेऊन दिलेली असते. घरातून निघाल्यानंतर ही मुले कुठे जातात यावर पालक तरी कुठवर लक्ष देणार? शिक्षक त्यांना कुठवर रोखणार? या मुलांच्या विकृत चाळ््यांचा दोष कोणाचा?

 

Web Title: shameless acts in public places in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.