पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही; देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 09:01 PM2023-02-25T21:01:30+5:302023-02-25T21:01:56+5:30

Nagpur News कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप होतोय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘निवडणुकीत पैसे वाटणे ही कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची संस्कृती आहे. भाजपची संस्कृती नाही,’ या शब्दात पलटवार केला.

Sharing money is not BJP's culture; Devendra Fadnavis' counterattack | पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही; देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही; देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

googlenewsNext
ठळक मुद्देपराभवाच्या भीतीने लावताहेत आरोप

 

नागपूर : कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप होतोय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘निवडणुकीत पैसे वाटणे ही कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची संस्कृती आहे. भाजपची संस्कृती नाही,’ या शब्दात पलटवार केला.

नागपुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. फडणवीस म्हणाले, पोटनिवडणुकीमध्ये पराभव दिसून येत असल्याने महाविकास आघाडी घाबरली आहे. कसबामध्ये पैसे वाटल्याचा आरोप करून आघाडी मतदारांचा अपमान करीत आहे. भाजप कधीच पैसे वाटत नाही, लोकच पक्षाला जिंकवून आणतात. पराभवाच्या भीतीने आघीडी आरोप लावत आहे.

फडणवीस यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. औरंगाबाद व उस्मानाबाचे नाव बदलण्याच्या निर्णयावर ते म्हणाले, काही लोकांना असे वाटते की, राज्यात जे काही होत आहे ते त्यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयामुळे होत आहे. काही लोकं तर असेही म्हणू शकतात की, त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला त्यानंतर हा निर्णय झाला. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. यापैकी सव्वा दोन वर्षे ते बंद दरवाज्यात होते. त्यामुळे उर्वरित दोन- तीन महिन्यात त्यांनी पूर्ण महाराष्ट्र बदलविला असेल, असे मला वाटत नाही.

नगरविकास व महसूल विभागाचीही अधिसूचना लवकरच

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने घेतला होता. आता केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे या शहरांचे नाव बदलले आहे. आता नगरविकास आणि महसूल विभागाची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. यानंतर संपूर्ण जिल्हा, मनपा व नगरपालिकेचे नाव बदलेल. ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

Web Title: Sharing money is not BJP's culture; Devendra Fadnavis' counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.