छायाकल्प चंद्रग्रहण आज; रात्री ८:४४ वाजता भारतातून दिसेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 07:00 AM2023-05-05T07:00:00+5:302023-05-05T07:00:11+5:30
Nagpur News भारतीयांना यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण येत्या ५ मे राेजी बुद्धपाैर्णिमेच्या दिवशी अनुभवायला मिळणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण असेल. म्हणजे ग्रहणातही चंद्राच्या तेजस्वितेवर फारसा फरक पडणार नाही.
नागपूर : भारतीयांना यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण येत्या ५ मे राेजी बुद्धपाैर्णिमेच्या दिवशी अनुभवायला मिळणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण असेल. म्हणजे ग्रहणातही चंद्राच्या तेजस्वितेवर फारसा फरक पडणार नाही.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. मात्र, पृथ्वीची सावली अंशत: चंद्रावर पडणार असल्याने त्याची प्रकाशमय आभा दिसत राहील. साधारणत: रात्री ८:४४ वाजल्यापासून ग्रहण पाहता येईल. रात्री १०:३० पासून ग्रहण वाढलेले असेल आणि रात्री १०:५२ वाजता सर्वाधिक झाकलेला असेल. रात्री १ वाजता ग्रहण संपेल. भारतातून ४ तास १८ मिनिटे हे ग्रहण चालेल. हे ग्रहण उघड्या डाेळ्यांनीही पाहता येणार आहे.