‘ती’ मागते न्यूड फोटो, ‘ते’ मागतात खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 07:00 AM2021-09-01T07:00:00+5:302021-09-01T07:00:07+5:30

Nagpur News सोशल प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून टोळीतील तरुणी वेगवेगळे तरुण, पुरुषांसोबत मैत्री करते. अचानक त्यांना व्हॉट्सॲपवरून न्यूड फोटो पाठवायला सांगते. नंतर तिचे साथीदार त्याचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागतात.

‘She’ asks for nude photos, ‘they’ ask for ransom | ‘ती’ मागते न्यूड फोटो, ‘ते’ मागतात खंडणी

‘ती’ मागते न्यूड फोटो, ‘ते’ मागतात खंडणी

Next
ठळक मुद्देनागपुरात आणखी एका टोळीचा छडा, एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सोशल प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून टोळीतील तरुणी वेगवेगळे तरुण, पुरुषांसोबत मैत्री करते. काही दिवस सलग चॅटिंग करून अचानक त्यांना व्हॉट्सॲपवरून न्यूड फोटो पाठवायला सांगते. नंतर तिचे साथीदार संबंधित व्यक्ती आणि नातेवाइकांना त्याचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागतात. खंडणी उकळण्याचा हा नवा फंडा गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या टोळ्यांकडून अमलात आणला गेला आहे. सक्करदऱ्यातील अशाच एका टोळीचा छडा लावून पोलिसांनी या टोळीतील एका भामट्याला अटक केली. (‘She’ asks for nude photos, ‘they’ ask for ransom)

राैनक प्रभू वैद्य असे आरोपीचे नाव असून, तो हुडकेश्वरमधील पिपळा फाटा भागात राहतो. त्याच्या टोळीतील तन्वयी नावाच्या एका मुलीने काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तरुणाने ती स्वीकारल्यानंतर चॅटिंग सुरू झाली. नंतर ते व्हॉट्सॲपवर बोलू लागले. तो एका सभागृहाचा मालक असल्याचे लक्षात आल्यानंतर तन्वयीने त्याला न्यूड फोटो पाठवायला सांगितले. तरुणाने तसेच केले. नंतर १ मे रोजी तरुणाला एकाचा फोन आला. तुझे आमच्याकडे न्यूड फोटो आहेत. ते व्हायरल करेन, अशी धमकी देऊन पहिल्या वेळी दीड हजार, दुसऱ्यांदा पाच आणि तिसऱ्यांदा ६ हजार रुपये उकळले.

बदनामीचा धाक दाखवून आरोपी वारंवार पैसे मागत असल्याने तरुण दहशतीत आला. त्याने आपल्या वडिलांना हा प्रकार सांगून आरोपींना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपी राैनक काही दिवसांपूर्वी थेट तरुणाच्या घरी पोहोचला. तरुणाचे वडील आणि काकांना न्यूड फोटो दाखवून तुमचा मुलगा माझ्या नात्यातील तरुणीसोबत अश्लील चॅटिंग करतो, असे सांगून त्याचे न्यूड फोटो दाखविले. हे प्रकरण मिटवायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमची बदनामी करू, अशी धमकी दिली. वडिलांनी ते मान्य करून सोमवारी त्याला मंगल कार्यालयात बोलाविले. दुसरीकडे सक्करदरा पोलिसांकडे तक्रार केली. ठरल्याप्रमाणे आरोपी पोहोचला. त्याने खंडणी स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली.

----

Web Title: ‘She’ asks for nude photos, ‘they’ ask for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.