‘लिव्हर’ देऊन तिने विणला मायेचा धागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:13 AM2018-08-26T01:13:44+5:302018-08-26T01:15:22+5:30

राखीपौर्णिमेला बहिण मायेचा धागा बांधते. तेव्हा लाडक्या बहिणीला भाऊही गिफ्ट देतो. पण, भावासमोरच काळ उभा होता. स्वत:च्या जीवावर उदार होत तिने मोठ्या भावाला यकृत दान केले अन् मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. १५ दिवसाच्या उपचारानंतर भाऊ आणि बहीण रक्षाबंधनाच्या पर्वावर आज हॉस्पिटलमधून घरी परतले. रविवारी ती त्याला ओवाळणार, राखी बांधणार. नेहमीप्रमाणे बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी तो घेणार. पण त्याच्या जीवाची रक्षा आधीच बहिणीने केली असल्याचे त्याला माहीत नसणार? कारण तिला भाऊ हवाय!

She gave a lever to her brother! | ‘लिव्हर’ देऊन तिने विणला मायेचा धागा!

‘लिव्हर’ देऊन तिने विणला मायेचा धागा!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘राखी’ची बहिणीकडून भावाला अनोखी भेट : ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’

 







सुमेध वाघमारे

लोकमत  न्यूज नेटवर्क

नागपूर : राखीपौर्णिमेला बहिण मायेचा धागा बांधते. तेव्हा लाडक्या बहिणीला भाऊही गिफ्ट देतो. पण, भावासमोरच काळ उभा होता. स्वत:च्या जीवावर उदार होत तिने मोठ्या भावाला यकृत दान केले अन् मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. १५ दिवसाच्या उपचारानंतर भाऊ आणि बहीण रक्षाबंधनाच्या पर्वावर आज हॉस्पिटलमधून घरी परतले. रविवारी ती त्याला ओवाळणार, राखी बांधणार. नेहमीप्रमाणे बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी तो घेणार. पण त्याच्या जीवाची रक्षा आधीच बहिणीने केली असल्याचे त्याला माहीत नसणार? कारण तिला भाऊ हवाय!
अडचणीत नेहमीच आपल्यासोबत असणारा, साथ न सोडणारा, समजुतदार प्रेमळ असा भाऊ असावा, असे बहिणींना वाटते आणि एखादी भोळीभाबडी, सुंदर मनाची,खट्याळ-खेळकर अशी बहीण असावी, असे भावाला वाटते. अनेकांच्या या इच्छा पूर्णही होतात. परंतु काळ येतो आणि दोघांची परीक्षा घेतो, तेव्हा भावाचे निरागस ‘प्रेम’ आणि बहिणीची अफाट ‘माया’चे वास्तव समोर येते. २३ वर्षीय निकिताच्यासमोरही काळ आला होता. तिने भावावरची अफाट माया सिद्ध करून दाखवली.
निकिताचा भाऊ प्रणय कुºहाडकर (२४) याचे यकृत निकामी झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. तातडीने यकृत प्रत्यारोपण न झाल्यास जीवावर बेतू शकते, असा इशाराही दिला. गरीब कुटुंबावर दु:खाची कुºहाड कोसळली. आजारातून सुखरूप बाहेर पडू, अशी आशाच प्रणयने सोडून दिली होती. याची माहिती मित्रांपर्यंत पोहचताच पैशांची जुळवाजुळव सुरू झाली. यकृतदानासाठी आईने पुढाकार घेतला. परंतु रक्तगट जुळत नव्हता. काय करावे या विवंचनेत असताना लहान बहीण निकिता समोर आली. मी देते यकृत, एवढेच ती म्हणाली, घरच्यांनी तिला चूप केले. तुझे लग्न व्हायचे आहे, जीवाला काही झाले तर.नको म्हणून नातेवाईकांनी डॉक्टरांना दुसरा पर्याय सुचविण्याची विनंती केली. डॉक्टरांनी निकिताच पर्याय असल्याचे स्पष्ट केले. आम्हा दोघांना काहीच होणार नाही, हे निकिताने पटवून दिले. पण एक अटही टाकली.
न्यू इरा हॉस्पिटलमध्ये मध्यभारतातील पहिलेच हे‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’ झाले. १५ दिवसाच्या उपचारानंतर शनिवारी हे दोघेही भाऊ-बहीण रुग्णालयातून घरी परतले. परंतु आजही भावाला आपला जीव बहिणीमुळे वाचला, हे माहीत नाही. त्याला हे सांगू नका हीच त्या बहिणीची अट होती. तिला त्याचे भाऊपण हिरावून घ्यायचे नाही, म्हणून तिचा खटाटोप आजही सुरू आहे. उद्या ती त्याला राखी बांधणार आणि नेहमीसारखा तो रक्षणाची जबाबदारी घेणार...तिलाही हेच हवे आहे.

 

Web Title: She gave a lever to her brother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.