ती शिकली सवरली अन् बिनबुलाये ससुराल निघाली ! प्रियकराचे पोलिसांपुढे घुमजाव

By नरेश डोंगरे | Published: May 4, 2023 06:26 PM2023-05-04T18:26:31+5:302023-05-04T18:27:16+5:30

काल-परवापर्यंत तिला गोडगुलाबी स्वप्न दाखविणाऱ्या दिल्लीतील प्रियकराला रेल्वे पोलिसांनी एक फोन केला अन् त्याने असे काही वाक्य वापरले की या तरुणीच्या प्रेमाची नशाच उतरली.

She learned and went to her in-laws house uninvited! Lover's turn to the police | ती शिकली सवरली अन् बिनबुलाये ससुराल निघाली ! प्रियकराचे पोलिसांपुढे घुमजाव

ती शिकली सवरली अन् बिनबुलाये ससुराल निघाली ! प्रियकराचे पोलिसांपुढे घुमजाव

googlenewsNext

नागपूर : काल-परवापर्यंत तिला गोडगुलाबी स्वप्न दाखविणाऱ्या दिल्लीतील प्रियकराला रेल्वे पोलिसांनी एक फोन केला अन् त्याने असे काही वाक्य वापरले की या तरुणीच्या प्रेमाची नशाच उतरली. ती ठाण्यात हमसून हमसून रडली अन् प्रेमभंगाचे दु:ख घेऊन घरी परतली. आई-बाबांसह कुटुंबीयांचा विरोध झिडकारून विना लग्नानेच ससुराल निघालेल्या तरुणीबाबतची ही रियल स्टोरी बुधवारी सायंकाळी रेल्वेस्थानकावर उघड झाली.

सजनी (वय २५) अन् तिच्याच वयाचा साजन (दोघांचीही नावे काल्पनिक) वर्षभरापूर्वी राजस्थानमध्ये एका लग्नसमारंभात भेटले. त्यांची जवळीक वाढली अन् मोबाईल नंबरही एक्सचेंज झाले. त्यानंतर ते तास न तास एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. दिल्लीत आपले असे आहे, तसे आहे, अशी फेकमफाक करून सजनीला साजन ईम्प्रेस करीत होता. 'जिना मरना तेरे संग' असेही बोलत होता. ईकडे सजनीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्याने ती बिथरली. घरचे जणू विरोधकच आहेत, अशा पद्धतीने ती वागू लागली. सोनूला लाडाकोडाने वाढविणारे, नंतर तिला नोकरीला लावणारे तिचे आईवडील तिच्या या वर्तनाने कमालीचे अस्वस्थ झाले होते. या पार्श्वभूमीवर, बुधवारी अचानक सजनी घरून निघाली.

बराच वेळ होऊनही ती परतली नाही. तिची बॅग, कपडेही दिसत नसल्याने कावरेबावरे झालेले कुटुंबीय रेल्वेस्थानकाकडे धावले. शोधाशोध केली, सजनी दिसत नव्हती. त्यामुळे ते रेल्वे पोलीस ठाण्यात पोहचले. तरुण मुलगी घरून गायब झाली, तिला वाचवा... अशी आर्जव त्यांनी रेल्वेच्या ठाणेदार मनीषा काशिद यांच्याकडे केली. आईने दिलेल्या माहितीवरून सजनी दिल्लीला जाऊ शकते, असा अंदाज बांधून ठाणेदार काशिद यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना रेल्वेस्थानकाच्या वेगवेगळ्या भागात शोध घेण्यासाठी पाठवले. डीबी पथकातील हवलदार मिश्रा आणि अंमलदार रोशन मोगरे यांना सजनी तिकिट काउंटरवर आढळली. त्यांनी तिला ठाण्यात आणले.

तिचा दृढनिश्चय अन् ते हतबल

दिल्लीत माझा साजन राहतो. तेथे जाऊन मी त्याच्याशी लग्न करणार आहे, तो आणि मी सज्ञान आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही, असे तिने निर्ढावलेपणाने सांगितले. तो काय करतो, कुठे राहतो, त्याची आर्थिक, काैटुंबिक स्थिती कशी आहे, असे प्रश्न आले असता, तो सधन आहे, खुप चांगला आहे, मला तो चांगला सुखात ठेवेले अशी भावनाही तिने बोलून दाखवली. तिचा तो दृढनिश्चय कुटुंबियांसोबतच पोलिसांनाही हतबल करणारा होता.

फोन लावला अन् सारेच बदलले

खातरजमा करण्यासाठी मनीषा काशिद यांनी साजनला फोन लावला. आपण रेल्वे पोलीस ठाण्यातून बोलतो. 'सजनी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी निघाली आहे. तू तयार आहे का, असा त्याला थेट सवाल केला. स्पिकर सुरू आहे, सजनी आणि आम्ही सर्व ऐकत आहोत, हेदेखिल सांगितले. त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. 'मी तिला बोलवलेच नाही. सजनीसारख्याच माझ्या अनेक मैत्रीणी आहेत. मी का प्रत्येकीशी लग्न करू का', असा उलट सवालही त्याने केला. ते ऐकून सजनी सैरभैर झाली. हमसून हमसून रडली. तिला शांत करत पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. त्यानंतर तिला आईसोबत घरी पाठविले.

तीन वेळा आला, तीस हजार हडपले

बडी बडी बाते करून सजनीला गोडगुलाबी स्वप्न दाखविणारा सोनू रिकामटेकडा अन् बोलबच्चन वृत्तीचा असल्याचे पुढच्या चाैकशीत स्पष्ट झाले. तो तिला भेटण्यासाठी तीन वेळा नागपुरात आला होता. त्याने सजनीकडून वेगवेगळी चाट मारून ३० हजार रुपये हडपल्याचेही पोलीस चाैकशीत पुढे आले आहे.
 

Web Title: She learned and went to her in-laws house uninvited! Lover's turn to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.