मेंढेपठार-लाखाेळी रस्ता खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:08+5:302021-06-03T04:08:08+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : ग्रामीण विकासात चांगल्या रस्त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, परंतु काटाेल तालुक्यात खेड्यापाड्यांना जाेडणाऱ्या रस्त्यांची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : ग्रामीण विकासात चांगल्या रस्त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते, परंतु काटाेल तालुक्यात खेड्यापाड्यांना जाेडणाऱ्या रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. काटाेल-नागपूर महामार्गालगतच्या मेंढेपठार ते लाखाेळी या पाच किमी रस्त्याची दुरवस्था झाली असून, रहदारीला माेठा अडसर ठरत आहे. ‘रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता’ अशीच काहीशी या मार्गाची अवस्था आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षच हाेत आहे.
मेंढेपठार, आजनगाव, लाखाेळी हा मार्ग पुढे चंदकापूर, माळेगाव, बाेर्डेपठार या गावांना जाेडला जाताे. या सर्व गावांतील नागरिक याच मार्गाने काटाेल येथे आपल्या दैनंदिन कामासाठी ये-जा करतात, परंतु मार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहे. रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकी वाहने उसळून कित्येकदा अपघात घडतात. रात्रीच्या अंधारात या रस्त्याने वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
मागील १० वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुणाचेच लक्ष नाही. वारंवार निवेदने, ठराव पारित करूनही या रस्त्याची दुरुस्ती तर साेडाच साधी डागडुजी करण्याची तसदी बांधकाम विभागाने घेतली नसल्याचे आजनगावचे उपसरपंच अरविंद तायवाडे यांनी सांगितले. पावसाळ्यात रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचल्याने अपघात घडतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती वा डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
....
खड्डे बुजविणार काेण?
मेंढेपठार ते लाखाेळी या मार्गाची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्ती केली नाही. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धाेरणामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्यातील खड्डे दुचाकीस्वारांसाठी एक प्रकारे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. आता पावसाळा ताेंडावर आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजविणार काेण, हा प्रश्नच आहे. पावसाळ्यापूर्वी किमान या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्य उत्तम तागडे यांनी केली आहे.
===Photopath===
020621\img-20210602-wa0145.jpg
===Caption===
मेंढेपठार ते लाखोळी मार्गाची अशी दुरवस्था झाली मात्र लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न या मार्गाने दळणवळण करनारे नागरिक करीत आहे