भांडेवाडीतील ‘शेल्टर’चा भटक्या श्वानांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:06 AM2021-09-13T04:06:57+5:302021-09-13T04:06:57+5:30

श्वानांची दहशत : भाग ५ गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानगरपालिकेच्या भांडेवाडीतील डॉग शेल्टरने भटक्या कुत्र्यांच्या उपचारामध्ये ...

Shelter in Bhandewadi supports stray dogs | भांडेवाडीतील ‘शेल्टर’चा भटक्या श्वानांना आधार

भांडेवाडीतील ‘शेल्टर’चा भटक्या श्वानांना आधार

Next

श्वानांची दहशत : भाग ५

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महानगरपालिकेच्या भांडेवाडीतील डॉग शेल्टरने भटक्या कुत्र्यांच्या उपचारामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. २०११ ते जुलै २०२१ पर्यंतच्या काळात येथे १४ हजार ९९४ पिसाळलेल्या भटक्या व जखमी कुत्र्यांवर शस्त्रक्रिया आणि उपचार झाले आहेत. यासाठी महानगरपालिकेची स्वतंत्र यंत्रणा असून वाहन, ॲब्युलन्स आणि स्टाफही आहे.

महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या भांडेवाडीकडे ३ श्वान उपद्रव निर्मूलन पथक आहे. या पथकांकडे तीन वाहने आहेत. यातील दोन वाहने झोननिहाय काम करतात. एका वाहनाकडे ५ झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक वाहनावर ४ ते ५ कर्मचारी आहेत. यासोबतच एक ॲम्ब्युलन्सही असून जखमी प्राण्यांना यातून उपचारासाठी भांडेवाडीच्या डॉग शेल्टरमध्ये आणले जाते. केवळ कुत्र्यांसाठीच नाही तर, सर्वच जखमी प्राण्यांसाठी येथून सेवा दिली जाते.

...

निर्बीजीकरण मोहीम थंडावली

२००६ पासून शहरात कुत्र्यांवरील नसबंदी मोहीम सुरू आहे. मात्र ऑगस्ट-२०२० पासून ही मोहीम बंद पडली आहे. तसेच कोरोना संक्रमणामुळे भटके कुत्रे पकडण्याचे कामही बंद आहे.

...

औषधोपचार नि:शुल्क

कुत्रा चावल्यानंतर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार केला जातो. यासाठी रेबिज लस उपलब्ध आहे. दरवर्षी यावर ५० लाख रुपये खर्च केला जात असून २०१५ पासून आजपर्यंत अडीच ते तीन कोटींचा खर्च झाल्याची माहिती आहे. मागील दीड वर्षाच्या काळात ९ हजार ५०४ रेबिज लसी मनपाच्या रुग्णालयांतून देण्यात आल्या.

...

रेबिज लसी

एप्रिल ते डिसेंबर २०२० : ३,४६४ लसी

जानेवारी ते जून २०२१ : ६०६० लसी

...

भांडेवाडीत जखमी आणि पिसळलेल्या कुत्र्यांवर झालेले उपचार

२०११-१२ : ४४४

२०१२-१३ : १०५७

२०१३-१४ : १०६९

२०१४-१५ : ६११

२०१५-१६ : ७४४

२०१६-१७ : १७११

२०१७-१८ : १३६५

२०१८-१९ : २२०३

२०१९-२० : २९७२

२०२०-२१ : २५२०

एप्रिल-जुलै २०२१ : २९८

एकूण : १४,९९४

...

Web Title: Shelter in Bhandewadi supports stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.