मेंढपाळांच्या चारा, वैरणाच्या समस्या सुटणार; पडळकसर यांचे प्रतिपादन
By मंगेश व्यवहारे | Published: December 19, 2023 04:22 PM2023-12-19T16:22:02+5:302023-12-19T16:25:24+5:30
सरकारकडे मेंढपाळांना चाऱ्यासाठी पासेस द्यावेत, अशी मागणी.
मंगेश व्यवहारे,नागपूर:चारा- वैरणासाठी स्थलांतरण करणाऱ्या मेंढपाळांना महाराष्ट्रात वन विभागाने चाऱ्यासाठी पास नाकारले होत.महाराष्ट्रातही अशा मेंढपाळांची संख्या मोठ्या संख्येत असल्याने आणि राज्यातील परिस्थिती लक्षात घेता बाहेर चारा शिल्लक राहिलेला नव्हता. त्यामुळे सरकारकडे मेंढपाळांना चाऱ्यासाठी पासेस द्यावेत, अशी मागणी सातत्याने सभागृहाकडे केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीची दखल घेऊन चारा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे गुजरातहून स्थलांतरीत होणाऱ्या मेंढपाळांना घेऊन मी मुख्यमंत्र्यांचे आभाव व्यक्त करायला आलो आहे, असे गोपिचंद पडळकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतना सांगितले.
आम्ही धनगर आरक्षणासंदर्भात विधानसभेत बाजू मांडत आहोत, असे सांगत पडळकर म्हणाले, आम्हाला एस. टी. मध्ये आरक्षण नको असून आम्ही एस. टी. मध्येच आहोत. राज्यात धनकड अशी जमात अस्तित्वातच नाही, याचे दाखल आम्ही न्यायालयाला दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही प्रतिक्षा करीत असलो तरी सरकारकडे आमची अभी भूमिका आहे, की प्रत्येक धनगर व्यक्तीला अनुसुचित जमातीचा दाखला सरकारने द्यावा, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.