लॉकडाऊन असतानाही स्टॉक मार्केटमध्ये चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:50+5:302021-05-01T04:07:50+5:30

आनंद शर्मा नागपूर : कोरोना महामारीमुळे देशाच्या विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्यानंतरही स्टॉक मार्केटमध्ये तेजीचे वातावरण आहे. गेल्यावर्षी एप्रिल आणि ...

Shine in the stock market despite the lockdown | लॉकडाऊन असतानाही स्टॉक मार्केटमध्ये चमक

लॉकडाऊन असतानाही स्टॉक मार्केटमध्ये चमक

Next

आनंद शर्मा

नागपूर : कोरोना महामारीमुळे देशाच्या विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्यानंतरही स्टॉक मार्केटमध्ये तेजीचे वातावरण आहे. गेल्यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात लावण्यात आलेले लॉकडाऊन हटल्यानंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आले आहे. वेगाने धावणारा व्यक्ती काही वेळ थांबून पुन्हा वेगाने धावतो, त्याचप्रमाणे कोविडची दुसरी लाट आल्यानंतर शेअर बाजारात तेजीचा क्रम सुरूच आहे. स्टॉक मार्केटमध्ये आलेल्या तेजीची अनेक कारणे सांगितली जात आहेत. लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू राहिल्यास आणि कोविड संक्रमणाचा वेग कमी होऊन त्याचा सकारात्मक परिणाम उद्योग-व्यवसायावर दिसून येणार असल्याचे मत स्टॉक मार्केटच्या विशेतज्ज्ञांचे आहे.

या संदर्भात शेअर बाजाराचे विशेतज्ज्ञ लितेश ठक्कर म्हणाले, शेअर बाजाराच्या दीड-दोन महिन्यांच्या पूर्व अंदाजावर काम करीत आहे. सध्याच्या कोविड लाटेत बाजार काही प्रमाणात स्थिर आहे, पण पूर्वीच्या अंदाजानुसार बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. लसीकरणाची मोहीम पुढेही सुरू राहिल्या बाजाराला आणखी बूस्ट मिळेल. जगात भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होत आहे. या कारणाने विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवित आहे. खरेदीदारांचा व्हॅल्यूम कमी असला तरीही दर वाढलेले आहेत. सार्वजनिक क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि पायाभूत क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. याच कारणांनी मेटल स्टॉक, पीएसयू जसे बँका आदींच्या शेअरचे भाव वाढत आहेत. सरकारतर्फे विविध सरकारी उपक्रमांमध्ये गुंतवणुकीच्या घोषणांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. याशिवाय फार्मा, वित्तीय आणि बँकिंग क्षेत्राच्या शेअरची स्थिती उत्तम आहे. गुंतवणूकदारांना सध्या स्टॉक होल्ड करण्यासह निवडक स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला ठक्कर यांनी दिला.

शेअर बाजार विशेतज्ज्ञ आनंद अग्रवाल म्हणाले, व्याजदर कमी होणे, जागतिक स्तरावर वेगाने बदलणारा व्यावसायिकांचा घटनाक्रम आणि चीनमध्ये विविध कंपन्यांनी काम बंद करणे तसेच चीनमधून उत्पादनांचा पुरवठा कमी होण्याचा फायदा भारताला मिळण्याची शक्यता पाहता कोविडची दुसरी लाट आल्यानंतरही शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. भारत सरकारतर्फे पायाभूत क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणे, विपरित स्थितीत सर्वाधिक जीएसटी कलेक्शन होणे आणि पहिल्या लॉकडाऊनच्या तुलनेत यावर्षी पूर्ण लॉकडाऊन न लावल्याने स्टॉक मार्केटला बूस्टर डोस मिळाला आहे. याच कारणांनी मेटल, सिमेंट, आयटी, फार्मा सेक्टर स्टॉक चांगली कामगिरी करीत आहेत. ग्लोबल मार्केटमध्येही स्थिती चांगली आहे. सिस्टिमध्ये तरलता आहे. त्यामुळेही शेअर बाजाराला बूस्ट मिळत आहे. कोविड स्थितीत सुधारणा झाल्यानंतर शेअर बाजारात आणखी तेजी दिसून येईल.

जास्त परताव्याने युवकांना

आकर्षित करीत आहे क्रिप्टोकरन्सी

सोने-चांदी, रुपयाच्या (फिजिकल करन्सी) काळात आता आभासी मुद्रा अर्थात क्रिप्टोकरन्सीच्या (ऑनलाइन) मार्केटमध्ये उत्साह संचारला आहे. हा बाजार २४ बाय ७, ३६५ दिवस चालतो. क्रिप्टोकरन्सी मार्केट तज्ज्ञ सायरस मेजर म्हणाले, विशेषत: युवकांमध्ये क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीची क्रेझ वाढली आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीची जास्त जोखीम असते, शिवाय जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. फिक्स डिपॉझिट आणि शेअरमध्ये मर्यादित परतावा मिळत असल्याने युवक क्रिप्टोकरन्स मार्केटकडे आकर्षित होत आहेत. जर त्यांना नुकसान झाले तर पुढे त्याची भरपाई करता येऊ शकते. विशेषत: दोन प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी बिटक्वाइन आणि ईथेरियममध्ये जास्त गुंतवणूक पाहायला मिळत आहे. त्यामध्ये कमी रक्कम टाकून जास्त परतावा मिळू शकतो. त्यामध्ये १०० रुपयेही टाकू शकता. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंगही शक्य आहे. सरकारतर्फे क्रिप्टोकरन्स मार्केटमध्ये नियमनाच्या दृष्टीने काही नियंत्रण आणल्यास जास्तीत जास्त लोक या मार्केटशी जुळतील. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मार्केटची विश्वसनीयता आणखी वाढेल.

गोल्ड मार्केटची चमक कायम

कोविड लॉकडाऊनच्या काळात सोने-चांदीची चमक कायम आहे. या संदर्भात वरिष्ठ सराफा व्यावसायिक विशाल पारेख म्हणाले, सोने-चांदीचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारावर अवलंबून असतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दरामध्ये बरीच सुधारणा पाहायला मिळत आहे. शिवाय खरेदीही वाढली आहे. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दरात सुधारणा दिसत आहे. लॉकडाऊनमुळे लग्नकार्य, प्रवास कमी झाल्याने लोकांकडे गुंतवणुकीसाठी रक्कम उपलब्ध असल्यानेही दर वाढले आहेत. परंतु गेल्या आठवड्यात थोडीफार घसरण दिसून आली. शुक्रवारी दहा ग्रॅम सोन्याचा दर ४६,७०० रुपये आणि किलो पक्की चांदीचे दर ६८ हजार रुपये होते.

Web Title: Shine in the stock market despite the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.