काळाबाजारीने पोलिसांच्या वर्दीवर शिंतोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:48+5:302021-06-11T04:07:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धान्याची काळाबाजारी करणाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून लाखोंची तोडी करणारे यशोधरानगरातील एका पीएसआयसह चाैघे निलंबित ...

Shintode on police uniforms for blackmail | काळाबाजारीने पोलिसांच्या वर्दीवर शिंतोडे

काळाबाजारीने पोलिसांच्या वर्दीवर शिंतोडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : धान्याची काळाबाजारी करणाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून लाखोंची तोडी करणारे यशोधरानगरातील एका पीएसआयसह चाैघे निलंबित झाले. मात्र, या प्रकरणाने पोलिसांच्या वर्दीवर शिंतोडे उडाले आहे. दरम्यान, धान्याची काळाबाजारी करणाऱ्यांना संरक्षण देऊन महिन्याला लाखोंची तोडी करणारे अनेक मुरलेले खेळाडू कारवाईपासून दूर असून ते नियमित लाखोंचे वारे न्यारे करीत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

धान्याची काळाबाजारी करणारे, सुपारीवाले तसेच अन्य अवैध धंदेवाल्यांना संरक्षण देऊन बदल्यात महिन्याला लाखोंची वसुली करणारे यशोधरानगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनीष भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पाल आणि शिपाई प्रसेनजित जांभूळकर हे मारहाणीमुळे या प्रकरणात अडकले. अनेक दिवसांपासून दराडेची डीबी पार्टी खाबुगिरीच्या वेगवेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत होती. ‘हमारा क्या बिगडेगा’ अशा अविर्भावात ते सर्व होते. मात्र, या तोडपाणी आणि मारहाणीच्या प्रकरणात मुख्यालयात बसून एकाने बाण सोडला. वरिष्ठांकडे त्याची तक्रार झाल्याने या चाैघांवर प्रकरणाला ‘विनोदात’ घेणे भोवले. आता हे चाैघे गेम करणाऱ्याकडे पोलीस मुख्यालयात पोहोचले आहेत. या प्रकरणाने पोलिसांच्या वर्दीवर शिंतोडे उडविले आहे. पकडले गेले म्हणून हे प्रकरण चर्चेला आले असले तरी काही पोलीस निरीक्षकांच्या वरदहस्तामुळे याहीपेक्षा अनेक मोठे खेळाडू जागोजागी नियमित लाखोंची वसुली करीत असल्याची जोरदार चर्चा आहे.

---

पोलीस आयुक्तांचे आदेश वेशीवर

कर्तव्य कठोर बनून गुन्हेगारी मोडून काढा, अवैध धंदे बंद करा आणि काळाबाजारी करणाऱ्यांना धडा शिकवून पोलीस ठाण्यातील कारभार पारदर्शी करा, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ठाणेदारांना दिले आहे. प्रत्येक क्राईम मीटिंगमध्ये त्याची आठवण करून दिली जाते. सोबत उलटसुलट काही दिसले तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला जातो. मात्र, काही ठाणेदार त्याला जुमानत नाहीत. तर काही कर्मचारी आणि कनिष्ठ अधिकारी ठाणेदारांना अंधारात ठेवून लाखोंची तोडपाणी करतात. जरीपटक्यातील रोशन, लकडगंजमधील नितीन, कळमन्यातील तिग्गी आणि आकरे, कपिलनगरातील प्रदीप मुख्यालयात पोहोचलेला एमआयडीसीचा बाला अशी अनेक नावे या संबंधाने पोलीस दलात चर्चेला आहेत. ही मंडळी एवढी निर्ढावली आहेत की ती सध्या कुणालाच जुमानत नाहीत.

-----

Web Title: Shintode on police uniforms for blackmail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.