शिर्डी विमानतळाचे नाव होणार श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 07:36 PM2017-12-21T19:36:18+5:302017-12-21T19:36:46+5:30
शिर्डी येथील विमानतळाला ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ’असे नाव देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव गुरुवारी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शिर्डी येथील विमानतळाला ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ’असे नाव देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव गुरुवारी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला.
सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी संबंधित ठराव मांडला. केंद्र सरकारच्या नागरी उड्डयण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सार्वजनिक वापर या श्रेणीअंतर्गत हवाई वाहतूक सेवेसाठी शिर्डीजवळ काकडी, तालुका कोपरगाव, जि. अहमदनगर येथे विमानतळ उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या विमानतळाला ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ’असे नाव देण्यासाठी तसा प्रस्ताव केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाकडे पाठविण्यापूर्वी त्याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची संमती आवश्यक होती. त्यासाठी ठराव मांडून मंजूर करण्यात आला.