शिवभोजन नागपूर जिल्ह्यात पाच ठिकाणी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 08:21 PM2020-01-07T20:21:20+5:302020-01-07T20:23:05+5:30
गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील पाच ठिकाणी शिवभोजन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याअंतर्गत जिल्ह्यातील पाच ठिकाणी शिवभोजन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
जिल्ह्यातील शिवभोजन सुरु करण्यात येणाऱ्या स्थळांमध्ये डागा हॉस्पिटल गोळीबार चौक, गणेशपेठ बसस्थानक, मातृसेवासंघ हॉस्पिटल महाल, कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना मार्केट व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल नागपूरचा समावेश आहे. इच्छूक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांनी आपले अर्ज अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे कार्यालय सिव्हील लाईन नागपूर येथे ९ जानेवारीपर्यंत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.
शिवभोजन भोजनालय चालविण्याकरिता अटी व शतीर्बाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या १ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीबाबतचे पालन करावे लागेल. अधिक माहितीसाठी अन्न व धान्य वितरण अधिकारी म्युझियमजवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर यांच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.