राणेंविरोधात शिवसैनिक आक्रमक, निदर्शने करीत पोलिसात तक्रारी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:11 AM2021-08-25T04:11:43+5:302021-08-25T04:11:43+5:30
नागपूर : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद नागपुरातही उमटले. शिवसेनेने आक्रमक ...
नागपूर : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद नागपुरातही उमटले. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत शहरात निदर्शने केली. सोबतच राणे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा अवमान करणारी अशी वक्तव्ये शिवसेना खपवून घेणार नाही, यापुढे शिवसेनेच्या स्टाईलनेच उत्तर देऊ, असा इशाराही देण्यात आला.
महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेनेतर्फे कोंबड्या उडवून आंदोलन करण्यात आले. युवासेना जिल्हा प्रमुख हितेश यादव व विक्रम राठोड यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी वेळीच पुतळा ताब्यात घेतला.
शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी प्रताप नगर पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. यावेळी शिवसैनिकांनी निदर्शने केली. आंदोलनात चंद्रहंस राऊत, श्याम चौधरी, ऋषी कारोंडे, राजू कनोजिया, आशिष मानपिया, गजानन चकोले, सिद्धू कोमजवार, राजेश रंगारी, अजय दलाल, राजू लांबट, राम पलेरिया, अजय चौधरी, विलास मामूलकर आदींचा समावेश होता.
उप जिल्हा प्रमुख बंडू तळवेकर यांच्यासह उत्तर नागपूर युवासेनेचे सुरेश साखरे, आशिष हाडगे, अब्बास अली, विधानसभा संघटक राम कुकडे आदींनी जरीपटका पोलीस ठाणे गाठत राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली. पूर्व नागपूर शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख यशवंत (गुड्डू) रहांगडाले यांच्या नेतृत्वात टेलिफोन एक्सचेंज चौकात निदर्शने करण्यात आली. रामकुलर चौक, जुनी शुक्रवारी येथे उपजिल्हा प्रमुख नाना झोडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.
राणेंच्या अटकेनंतर जल्लोष ()
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर सायंकाळी शिवसेनेतर्फे जल्लोष करण्यात आला. खासदार कृपाल तुमाने यांच्या भांडेप्लाॅट येथील कार्यालयात शिवसैनिक जमा झाले व घोषणाबाजी करीत आनंद व्यक्त केला. यावेळी सहसंपर्क प्रमुख चंद्रहास राऊत, सतीश हरडे, जिल्हा प्रमुख संदीपभाऊ ईटकेलवार, माजी शहर प्रमुख सूरज गोजे, महिला संघटिका बोधनकर, राजेश कनोजिया, ओंकार पारवे आदी उपस्थित होते. मानेवाडा चौकात शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात ढोल ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला.