‘स्मार्ट सिटी’ धोरणाविरुद्ध शिवसेनेचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 09:11 PM2019-07-25T21:11:16+5:302019-07-25T21:12:39+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या धोरणांवर टीका करीत शिवसेनेर्ने गुरुवारी महापालिकेवर हल्लाबोल केला. स्मार्ट सिटीचा प्रस्तावित नकाशा रद्द करून नागपूर सुधार प्रन्यासच्या विकास योजनाच अमलात आणण्यात यावी, पारडी घाटसमोर विकासानंद मिशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील ले-आऊटपर्यंत प्रस्तावित रोड रद्द करण्यात यावा, कृषी जमिनीचा मोबदला पाचपट देण्यात यावा, व्यावसायिक जागांच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यात तीन हजार रुपये प्रति वर्गफूट मोबदला मिळावा आणि मोबदल्याचा ६०/४० फॉर्म्युला रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या धोरणांवर टीका करीत शिवसेनेर्ने गुरुवारी महापालिकेवर हल्लाबोल केला.
स्मार्ट सिटीचा प्रस्तावित नकाशा रद्द करून नागपूर सुधार प्रन्यासच्या विकास योजनाच अमलात आणण्यात यावी, पारडी घाटसमोर विकासानंद मिशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील ले-आऊटपर्यंत प्रस्तावित रोड रद्द करण्यात यावा, कृषी जमिनीचा मोबदला पाचपट देण्यात यावा, व्यावसायिक जागांच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यात तीन हजार रुपये प्रति वर्गफूट मोबदला मिळावा आणि मोबदल्याचा ६०/४० फॉर्म्युला रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
शिवसेनेचे कार्यकर्ते मनपा कार्यालयावर पोहोचले तेव्हा त्यांना पोलिसांनी अडवले. काही वेळानंतर स्मार्ट सिटीचे सीईओ रामनाथ सोनवणे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने चर्चा केली. सोनवणे यांनी या मागण्यांवर १० ऑगस्टपूर्वी भवानी मंदिरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राजू तुमसरे, नितीन तिवारी, चिंटू महाराज, गुड्डू रहांगडाले, किशोर कुमेरिया, रामचरण दुबे, हितेश यादव, विक्रम राठोड, मालिनी भावे, सुरेखा खोब्रागडे, अलका दलाल, प्रवीण जुमडे, किशोर ठाकरे, सुनील बॅनर्जी, प्रवीण शर्मा, राम कुकडे, आशिष देशमुख, अजय दलाल, मोहन गुरुपंच, योगेश न्यायखोर, छगन सोनवणे, यश जैन, मंजू शर्मा, सीमा पांडेय, संजय राऊत, समित कपाटे, द्वारका साहू, अरविंद राजपूत, अमोल निंबाळकर, विशाल कोरके, मुकेश रेवतकर, दीपक पोहनकर, संजोग राठोड, संदीप पटेल, अक्षय मेश्राम, सोनू शुक्ला, आशिष हाडगे, अब्बास अली, कृष्णा चावके आदींचा समावेश होता.