शिवसेनेला पाठिंबा, पवारांकडून संकेत!

By admin | Published: February 27, 2017 01:38 AM2017-02-27T01:38:12+5:302017-02-27T01:38:12+5:30

मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. भाजपा आणि शिवसेनेत दोन जागांचाच फरक आहे.

Shiv Sena support, Pawar signs! | शिवसेनेला पाठिंबा, पवारांकडून संकेत!

शिवसेनेला पाठिंबा, पवारांकडून संकेत!

Next

आघाडी केल्यास १८ जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता
मुंबई/ नांदेड : मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. भाजपा आणि शिवसेनेत दोन जागांचाच फरक आहे. शिवसेना जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करेल, मात्र वेळ आलीच तर भाजपा वगळता इतर पक्षांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे सांगून खा. शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण ९ जागा जिंकल्या आहेत. आपण भाजपाला पाठिंबा देणार नाही हे पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या असून, एका अपक्षासह विजयी झालेल्या तीन बंडखोर उमेदवारांनी पाठिंबा दिला आहे. परिणामी, सेनेचे संख्याबळ ८८ झाले आहे. तर भाजपाकडे ८२ जागा आहेत. संख्याबळानुसार शिवसेना किंवा भाजपा दोन्ही पक्ष स्वबळावर महापौर निवडून आणू शकत नाहीत. एकतर दोघांना एकत्र यावे लागेल, अथवा काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागेल. मात्र, शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तरच पाठिंबा देऊ, अशी अट काँग्रेसने

 

Web Title: Shiv Sena support, Pawar signs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.