अमेरिकेत शिवराज्याभिषेक सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:41+5:302021-02-26T04:10:41+5:30
नागपूर : अमेरिकेतील मराठी बांधवांनी शिवजयंतीनिमित्त कनेक्टिकट राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला. याप्रसंगी देसीज कनेक्टिकट संस्था व कनेक्टिकट मराठी ...
नागपूर : अमेरिकेतील मराठी बांधवांनी शिवजयंतीनिमित्त कनेक्टिकट राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला.
याप्रसंगी देसीज कनेक्टिकट संस्था व कनेक्टिकट मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा इतिहास उलगडणारे महानाट्य सादर करण्यात आले. हे महानाट्य महिनाभराच्या तालमीतून उभे राहिले. कार्यक्रमादरम्यान, कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले, अशी माहिती गौतम नाईक यांनी दिली. मल्लखांब संघटनेचे उपेंद्र वाटवे यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली होती. नाईक व प्राजक्ता दीक्षित यांनी कार्यक्रमाची संहिता लिहिली, तर दुर्गेश जोशी, किरण परांजपे व मुकुंद अवटी यांनी कार्यक्रमाचे संयाेजन केले. पार्श्वसंगीत व पोवाड्याचे संगीत अनुप्रिया कायंदे व प्रसाद दीक्षित यांनी दिले. नृत्य दिग्दर्शन मोहना जोग व सीमा वाटवे यांनी केले. देशी खेळ व लेझीमचे आयोजन वैदेही परांजपे यांनी केले. रंगभूषा, कला, वेशभूषा कीर्ती मोरे, उपेंद्र वाटवे, सीमा वाटवे व दीपाली अवटी यांनी केले. याशिवाय योगेंद्र जोग, संतोष कायंदे, स्वरा कायंदे, रणधीर जयस्वाल, चिन्मय पाटणकर, राहुल जोशी, महेश वाणी, नीरज नरगुंद आदींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.