चित्रांश कायस्थ समाज बहूद्देशीय संस्थेच्या वतीने शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:25 AM2021-02-20T04:25:42+5:302021-02-20T04:25:42+5:30
चित्रांश कायस्थ समाज बहूद्देशीय संस्थेच्या वतीने गांधीद्वार, महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात ...
चित्रांश कायस्थ समाज बहूद्देशीय संस्थेच्या वतीने गांधीद्वार, महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र श्रीवास्तव यांनी शिवरायांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. याप्रसंगी उज्ज्वल गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कटारिया, सुशील श्रीवास्तव, विनोद खन्ना, शीतल चिमूरकर, निखिल मिसळ, कविता हिंगणकर, कंचन करांगरे उपस्थित होते.
आंबेडकरी विचार मोर्चा ()
आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी संघटनेचे सचिव सुभाष बढेल, शहराध्यक्ष प्रा. रमेश दुपारे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, मामासाहेब मेश्राम, भाऊराव वाहणे, प्रा. अनुप थूल, विशांत बढेल, शंकर खरे, मनोहर इंगोले, राजूदादा पांजरे, रितेश सिकलवार उपस्थित होते.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती ()
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती साजरी करण्यात आली. सकाळी ६ वाजता पंचामृताने महाराजांच्या महाल, गांधीद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला अभिषेक घातला गेला. त्यानंतर शंख पथकाचे शंखवादन झाले. शंकरनगर येथील मूकबधिर शाळेच्या शिक्षकांनी सांकेतिक भाषेत मानवंदना वाहिली. याप्रसगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस निरिक्षक भारत क्षीरसागर, डॉ. संदीप आकरे, नीलेश देशमुख, डॉ. श्रुती आष्टनकर, सचिन कुंभारे उपस्थित होते. सोहळ्याला दत्ता शिर्के, दिलीप दिवटे, महेश महाडिक, विवेक पोहाणे, प्रवीण घरजाळे, पंकज धुर्वे, जय आसकर, अभिषेक सावरकर, वेदांत गेटमे, मोहित येडे, आशीष खडके, सुमित भोयर, सार्थक हरड, अभिजत डायगणे, रोहित मौंदेकर, वेदांत नाथे, दीपक मौंदेकर, मोहित येंडे, अक्षय ठाकरे, सचिन झाडे, भावेश मशिदकर, हर्षल निमजे, प्रज्वल अवचट, जगदीश वानोडे, क्रीश गोसेवाडे उपस्थित होते.