काटोल शहरात शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:25 AM2021-02-20T04:25:20+5:302021-02-20T04:25:20+5:30
काटाेल : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काटाेल शहरात विविध संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी सांस्कृतिक, प्रबाेधनात्मक व इतर कार्यक्रमांचे आयाेजन ...
काटाेल : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काटाेल शहरात विविध संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी सांस्कृतिक, प्रबाेधनात्मक व इतर कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमांंना मान्यवरांसह नागरिकांनी हजेरी लावली हाेती.
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने काटाेल शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक-२च्या मैदानावर रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात १६३ तरुणांनी रक्तदान केले. आयाेजनासाठी समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या काटोल शाखेच्या वतीने शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते. त्यात १३७ तरुणांनी रक्तदान केले. काटाेल येथील राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालयात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी मुख्याध्यापक उत्तम सावरकर, पालक संचालक अरुण राऊत, शिक्षक रामदास नासरे, नरेंद्र ढबाले, सेवादास निकोसे, विलास चरडे, विजय कोरडे, अमोल आकोडे, वसतिगृह अधीक्षक प्रशांत साठोणे, प्रेमलाल आसोले, ईश्वर धुर्वे उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, विजय महाजन, राजेंद्र सरोदे, भाजयुमाेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत अंतुरकर, सोपान हजारे, नगरसेवक राजू चरडे, प्रमोद निर्वाण, व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत पटेल, रमेश सावल, मनीष धवड, हेमंत धवड, अश्विन रिधोरकर, शुभम परमाल, ललित काथोळे, शुभम भस्मे, चैतन्य भजन, प्रतीक जवंजाळ, रोशन झळके, कुणाल ढगे, गौरव जयस्वाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.