शिवभोजन थाळी भरणार गरिबांचे पोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:07 AM2021-04-16T04:07:01+5:302021-04-16T04:07:01+5:30
नागपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनसोबतच गरिबांना दिलासादायक पाऊल उचलले आहे. याअंतर्गत शिवभोजन थाळी मोफत ...
नागपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनसोबतच गरिबांना दिलासादायक पाऊल उचलले आहे. याअंतर्गत शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील आदेशाचे पत्र मिळताच गुरुवारपासून नागपूर जिल्ह्यात ही अंमलबजावणी सुरू झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील व शहरातील सुमारे पाच हजार लोकांनी पहिल्या दिवशी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे.
नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून ३४ शिवभोजन थाळी केंद्र आहेत. या दोन्ही भागातील केंद्रांवर रोज लाभार्थी ५ रुपयात जेवण घेत असत. शासनाकडून मिळालेल्या पत्रानुसार, यापुढे ३० एप्रिलपर्यंत ही मोफत योजना राबविली जाणार आहे.
...
शिवभोजन थाळी केंद्र नागपूर शहर : १०
नागपूर ग्रामीण : २४
...
रोज घेतात लाभ
नागपूर शहर : २,२५०
नागपूर ग्रामीण : २,२७५
...
थाळीचा लाभ घेणारे (कोट)
आम्हा गरिबांचे पोट भरण्यासाठी सरकारने मोफत जेवण देण्याची योजना आखली आहे. हातातून काम सुटलेल्या काळामध्ये सरकारने हा मोठा आधार दिला आहे.
- सुधाकर इंगळे
...
सरकारने गरिबांची काळजी घेतली आहे. घरात अन्न नाही, खिशात पैसा नाही, अशा वेळी सरकारने गरिबांसाठी घेतलेला हा निर्णय मोठा आहे.
- भोजराज टेंभरे
...
कठीण दिवसात गरिबांच्या पाठीशी धावून आलेल्या या सरकारने गरिबांच्या भावना ओळखल्या. हाताला काम नसलेल्या या काळात जेवणाची मोफत सोय झाली, याचा आनंद आहे.
- आरुषी वाडीघरे
...
बॉक्स
पाच हजारावर लाभार्थी घेतात लाभ
- नागपूर शहरातील १० आणि ग्रामीण भागातील २४ अशा एकूण ३४ केंद्रावरून मोफत शिवभोजन थाळी योजनेचा जवळपास पाच हजार लाभार्थी लाभ घेत आहेत. यामुळे गरिबांच्या आणि निरश्रितांच्या जेवणाची सोय झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. लॉकडाऊनच्या काळात हा मोठा दिलासा मिळाला आहे.
- जानेवारी-२०२० ते मार्च-२०२१ या काळात नागपूर शहरामध्ये असलेल्या १० केंद्रांवरून योजनेंतर्गत ६ लाख ४८ हजार ६९५ शिवभोजन थाळी वितरित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक ५ रुपये याप्रमाणे २ कोटी ८९ लाख ४७ हजार ५१० रुपयांचे अनुदान वाटण्यात आले आहे.
...
शहरातील ही आहेत १० केंद्र
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सह.संस्था (डागा हॉस्पिटल)
सुरभी शिव बहुउद्देशीय संस्था (डागा हॉस्पिटल)
श्रीमती जानकीदेवी बहुउद्देशीय संस्था (मेडिकल हॉस्पिटल)
श्री गणेश भोजनालय (मेडिकल हॉस्पिटल)
श्री गुरुदेव भोजनालय (कॅन्सर हॉस्पिटल)
मंथन महिला बचत गट (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल)
सी.आर. ट्रेडर्स (कृषी उत्पन्न बाजार समितीमधून पार्सल सुविधा)
तेलमासरे भोजनालय (कृषी उत्पन्न बाजार समितीमधून पार्सल सुविधा)
मातोश्री जिजाऊ माँसाहेब बहुउद्देशीय संस्था (मेयो हॉस्पिटल)
सुविधा बहुउद्देशीय संस्था (मेयो हॉस्पिटल)
...