अमरावती, यवतमाळ, भंडारासाठी विनावाहक शिवशाही बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:17 AM2019-04-20T11:17:59+5:302019-04-20T11:19:29+5:30
एसटी महामंडळाने गणेशपेठ आगारातून अमरावती, यवतमाळ आणि भंडारासाठी विनावाहक, विनाथांबा शिवशाही बसेसच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाने गणेशपेठ आगारातून अमरावती, यवतमाळ आणि भंडारासाठी विनावाहक, विनाथांबा शिवशाही बसेसच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहेत. यासाठी विंडो बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विनावाहक, विनाथांबा शिवशाही बसेस सुरू केल्यामुळे प्रवाशांना मोठी सुविधा होणार आहे. यात गाडी मार्गात कुठेही थांबणार नसल्यामुळे संबंधित ठिकाणी बस लवकर पोहोचून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. यवतमाळ,अमरावतीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ७.३० या वेळेत या शिवशाही बसेस दर अर्ध्या तासाला उपलब्ध राहतील तर भंडारासाठी सकाळी ६ ते रात्री ८.४५ दरम्यान शिवशाही बसेस दर १५ मिनिटांनी उपलब्ध राहणार आहेत.
प्रवासी विंडो तिकीट घेऊन बसमध्ये बसणार आहेत. यामुळे बसमध्ये चढताना प्रवाशांची गर्दी होणार नसल्याने पाकिटमारांपासून त्यांचा बचाव होणार असल्याची माहिती गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक विजय कुडे यांनी दिली.