औद्योगिक क्षेत्राला बसणार वीज दरवाढीचा ‘शॉक’
By मोरेश्वर मानापुरे | Published: March 2, 2023 09:05 PM2023-03-02T21:05:03+5:302023-03-02T21:05:50+5:30
- महावितरणची आयोगाकडे ३५ टक्के दरवाढीची शिफारस : स्पर्धेत उत्पादनांची किंमत वाढणार; उद्योग बंद होण्याची भीती
नागपूर : महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (एमईसीएल) ६४.६४ कोटी रुपयांची तूट दोन वर्षांत भरून निघावी म्हणून ३७ टक्के दरवाढीची शिफारस केली आहे. ही दरवाढ प्रति युनिट २.५५ रुपये अर्थात हे दर १०.५० रुपयांपर्यंत जाणार आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे दर आधीच जास्त आहेत. दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडून जबरदस्त शॉक बसणार आहे. अनेकांनी उद्योग लगतच्या राज्यात स्थलांतरित करण्याची तयारी केली आहे.
एमईसीएलची सुनावणी ३ मार्चला सकाळी १०.३० वाजता मुंबईत होणार आहे. आॅनलाईन होणाºया या सुनावणीला उद्योग संघटनांचे पदाधिकारी वनामती सभागृहात उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी महावितरणचे मुख्य अभियंते दिलीप दोडके यांना वी दरवाढ थांबविण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर म्हणाले, वाढीव वीजदर उद्योगांना घातक ठरेल. कोरोनानंतर सूक्ष्म व लघु उद्योग नव्याने उभे राहू लागले आहेत. ते सक्षम होण्याच्या आतच ३५ टक्के दरवाढ केली जात आहे. उद्योग एवढी दरवाढ सहन करू शकणार नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम