धक्कादायक! विदर्भात ५,११३ नवे पॉझिटिव्ह, ३९ मृत्यू; नागपुरात आतापर्यंतच्या सर्वाधिक २,५८७ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 07:43 AM2021-03-17T07:43:02+5:302021-03-17T07:43:33+5:30
नागपूर जिल्ह्यातही आज रुग्णसंख्येचा विक्रम झाला. आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. २,५८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी १८ रुग्णांचे बळी गेले.
नागपूर: विदर्भात मागील काही दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्येचे जुने विक्रम मोडित निघत आहेत. आज पुन्हा सर्वाधिक ५,११३ रुग्णांची नोंद झाली तर ३९ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ३,८०,६८७ झाली आहे. नागपूर व बुलडाण्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने विदर्भात कोरोनाचा ग्राफ वाढत आहे. (Shocking! 5,113 new positives, 39 deaths in Vidarbha; Nagpur recorded the highest number of 2,587 patients so far)
नागपूर जिल्ह्यातही आज रुग्णसंख्येचा विक्रम झाला. आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. २,५८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी १८ रुग्णांचे बळी गेले. नागपूर विभागात आता सर्वच जिल्ह्यात थोड्याफार फरकाने रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. विशेषत: वर्धा जिल्ह्यात आज २५४ रुग्ण व ३ मृत्यू तर चंद्रपूर जिल्ह्यात १२१ रुग्ण व २ मृत्यूंची भर पडली आहे. अमरावती विभागात पुन्हा रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बुलडाण्यात ५६७ रुग्ण व २ मृत्यू, अमरावतीमध्ये ४७५ रुग्ण ३ मृत्यू, अकोल्यात ३९१ रुग्ण व ३ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ३५२ रुग्ण व ८ मृत्यू तर वाशिम जिल्ह्यात २१८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.