धक्कादायक : नागपुरात अनेक पॉश हॉटेलमध्ये चालतोय देह व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 10:11 PM2018-09-26T22:11:59+5:302018-09-26T22:12:49+5:30

नागपुरातील अनेक पॉश हॉटेलमध्ये देहव्यापाराचा अड्डा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदासपेठ, सदर आणि वर्धा रोडवरील या हॉटेलमध्ये चालत असलेला देहव्यापार आता हाय प्रोफाईल बनला आहे. शहर पोलिसांनाही हा सर्व प्रकार माहीत आहे, परंतु काय कारण आहे माहीत नाही, ते हॉटेल संचालकांना रंगेहात पकडू शकत नाही. देहव्यापाराच्या टोळीतील एका सदस्याची विचारपूस केली असता ही माहिती पुढे आली.

Shocking: Body trade in many posh hotels in Nagpur | धक्कादायक : नागपुरात अनेक पॉश हॉटेलमध्ये चालतोय देह व्यापार

धक्कादायक : नागपुरात अनेक पॉश हॉटेलमध्ये चालतोय देह व्यापार

googlenewsNext
ठळक मुद्देदेहव्यापाराच्या टोळीतील एका सदस्याची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील अनेक पॉश हॉटेलमध्ये देहव्यापाराचा अड्डा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदासपेठ, सदर आणि वर्धा रोडवरील या हॉटेलमध्ये चालत असलेला देहव्यापार आता हाय प्रोफाईल बनला आहे. शहर पोलिसांनाही हा सर्व प्रकार माहीत आहे, परंतु काय कारण आहे माहीत नाही, ते हॉटेल संचालकांना रंगेहात पकडू शकत नाही. देहव्यापाराच्या टोळीतील एका सदस्याची विचारपूस केली असता ही माहिती पुढे आली.
पोलिसांनी अलीकडेच १२ दिवसाच्या आत देहव्यापाराचे ६ अड्डे उघडकीस आणले. सीताबर्डी पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल गंगा-काशी येथील दलाल सचिन सोनारकर आणि धंतोलीतील केपी इन हॉटेलमध्ये प्रणिता जयस्वाल हिची अटक ही महत्त्वाची मानली जात आहे. दोघांकडे उजबेकिस्तानमधील तरुणी सापडल्या. सचिन मागील दहा वर्षांपासून देहव्यापारात सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. हॉटेल गंगा-काशीमध्ये झालेल्या कारवाईने सीताबर्डी पोलीसही हादरले आहे. सीताबर्डी पोलीस सचिनकडून काही विशेष माहिती मिळवू शकलेले नाही. परंतु प्रणिताकडून मात्र शहरात पसरलेल्या देहव्यापाराच्या नेटवर्कची माहिती मिळाली.
सूत्रानुसार मोठे ग्राहक सुरक्षित जागेला प्राधान्य देतात. अनेकदा तर ते स्वत:च हॉटेलची खोली बुक करतात. शहरातील पॉश हॉटेलमध्ये त्यांची ‘सेटींग’ असल्याने त्यांना सहजपणे खोली मिळते. दलालाचे काम केवळ तरुणी उपलब्ध करून देणे असते. ते ग्राहकाच्या बोलावलेल्या हॉटेलमध्ये तरुणी सोडून निघून जातात. या प्रकारच्या ग्राहकांना दलालही विशेष प्राधान्य देतात. असे सांगितले जाते की, शहरात असे ८ ते १० मोठे दलाल आहे. प्रत्येक दलालाकडे या प्रकारचे ग्राहक असतात. ग्राहकाचा कॉल आल्यास एका दलालाकडे तरुणी नसेल तर ते दुसऱ्या दलालाची मदत घेतात. दलाल स्वत: किंवा आपल्या एखाद्या साथीदाराच्या माध्यमाने तरुणी ग्राहकापर्यंत पोहोचवतात.
पोलिसांच्या तपासात काही मोठ्या पॉश हॉटेलची नावे समोर आली आहेत. आतापर्यंत देहव्यापाराच्या अड्ड्यावर पकडण्यात आलेले दलाल हे या हॉटेलची नावे सांगण्यास मागेपुढे पाहात होते. परंतु हॉटेलची नावे समोर आल्यानंतरही पोलिसांकडे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ठोस असे पुरावे नाहीत. या हॉटेलच्या संचालकांचे संबंधही वरपर्यंत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच पोलीस त्यांची नावे जाहीर करण्यास मागेपुढे पाहत आहे.
उपराजधानीतील मोठे दलाल मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमाने देहव्यापाराचा धंदा करतात. ते दुसºया राज्यातील दलालांच्या मदतीने येथे तरुणी बोलावतात. यात दिल्लीचा अश्विन, जॉन, मुंबईचा सिकंदर, आलोक, बेंगळुरुची ममता या दलालांचा प्रामुख्याने समावेश आहे. नागपुरात सचिन सोनारकर याच्यासह अमन, रेहान, अमजद, जॉन, मनोज, कुमार, विशाल आणि सीपी हे देह व्यापाराशी जुळले असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Shocking: Body trade in many posh hotels in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.