धक्कादायक! नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली जिवंत स्फोटके भरलेली बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 09:07 PM2022-05-09T21:07:16+5:302022-05-09T22:33:35+5:30

Nagpur News नागपूर रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेश दाराच्या जवळ असलेल्या ट्रॅफिक पोलीसच्या चौकीच्या मागे जिवंत स्फोटके भरलेली बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली. 

Shocking! Bomb found at Nagpur railway station | धक्कादायक! नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली जिवंत स्फोटके भरलेली बॅग

धक्कादायक! नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली जिवंत स्फोटके भरलेली बॅग

Next

नागपूर - पोलीस बूथच्या बाजूला जिवंत स्फोटके असलेली बॅग आढळल्याने रेल्वेस्थानक परिसरात प्रचंड खळबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने ही स्फोटके भरलेली बॅग ताब्यात घेऊन ती सुरक्षित ठिकाणी नेली. सोमवारी रात्री घडलेल्या या घडामोडीमुळे रेल्वे अन् सुरक्षा यंत्रणेला प्रचंड हादरा बसला असून वृत्त लिहस्तोवर तेथे प्रचंड दहशतीचे वातावरण होते.

बॉम्ब शोधक पथक म्हणजेच बीडीडीएस ने ती बॉम्ब सदृश वस्तू ताब्यात घेऊन डिफ्युज करण्यासाठी पोलीस मुख्यालय परिसरात नेली आहे....
रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे बॉम्ब सदृश वस्तू मध्ये एक छोटे डेटोनेटर आणि लो intensity च्या स्फोटकांचा 55 छोट्या कांड्या एकमेकांशी सर्किट ने जोडलेल्या स्वरूपात होते...

बीडीडीएस ला प्राथमिक दृष्ट्या ते जिवंत बॉम्ब सारखे वाटल्यामुळे सध्या ती बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या परिसरातून ताब्यात घेऊन बीडीडीएस च्या खास गाडीमध्ये पोलीस मुख्यालय परिसरात नेण्यात आली आहे....

संध्याकाळी सातच्या सुमारास ही बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या मुख्य दारा जवळील ट्राफिक पोलीस चौकीच्या मागे तार ने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर आधी पोलिसांनी त्याची पाहणी केली, ती वस्तू इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या स्वरूपात असल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले... त्यानंतर मुख्य दारावर तसेच मुख्य दाराच्या समोरील रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली... बॉम्ब शोधक पथकाने ते ताब्यात घेऊन विशेष गाडीने पोलीस मुख्यालयात नेले आहे....

दरम्यान डेटोनेटर आणि त्यासोबत सर्किट ने जोडलेल्या त्या कांड्या किती घातक होत्या हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही....

Web Title: Shocking! Bomb found at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.