धक्कादायक! नागपूरची हवा नोव्हेंबरमध्ये तीसही दिवस प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2022 08:10 AM2022-12-04T08:10:00+5:302022-12-04T08:10:01+5:30

Nagpur News शहराचा एक्यूआय १२ दिवस १५० व १२ दिवस २०० च्यावर पाेहोचला आहे. उरलेले चार दिवसही समाधानकारकच्या श्रेणीत नाही.

Shocking! Nagpur's air is polluted for thirty days | धक्कादायक! नागपूरची हवा नोव्हेंबरमध्ये तीसही दिवस प्रदूषित

धक्कादायक! नागपूरची हवा नोव्हेंबरमध्ये तीसही दिवस प्रदूषित

googlenewsNext
ठळक मुद्देएमपीसीबीचा नाेव्हेंबरचा अहवालएक्यूआय १५०, २०० च्याही वर

 निशांत वानखेडे

नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) ने सादर केलेला नाेव्हेंबर महिन्यातील नागपूर शहराच्या वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) चा अहवाल धक्कादायक आहे. शहराची हवा २४ दिवस प्रदूषित असल्याचे यातून निदर्शनास येत आहे. शहराचा एक्यूआय १२ दिवस १५० व १२ दिवस २०० च्यावर पाेहोचला आहे. उरलेले चार दिवसही समाधानकारकच्या श्रेणीत नाही.

वाहतुकीसह कचरा ज्वलनातून हाेणाऱ्या प्रदूषणासह नागपूरला लागून असलेले औष्णिक वीज केंद्र हे प्रदूषणाचे माेठे कारण आहे. त्यातून कार्बन, नायट्राेजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे प्रदूषण वाढले आहे. मात्र, शहरात विकास प्रकल्प व इमारतींच्या बांधकामामुळे वाढलेला धूलिकणांचा स्तर हे प्रदूषणाचे सर्वांत माेठे कारण ठरले आहे. पीएम-२.५ व पीएम-१० हे प्रदूषक घटक धाेकादायक ठरले आहेत. जागतिक आराेग्य संघटनेच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पट धूलिकण प्रदूषणाचा स्तर शहरात वाढला आहे.

नीरीचे वायू प्रदूषण विभागाचे प्रमुख डाॅ. जाॅर्ज यांच्या मते, हिवाळा सुरू हाेताच शहरात प्रदूषणाचा स्तर वाढताे. दिवाळीनंतरच यात वाढ हाेते. नाेव्हेंबर-डिसेंबर आणि उन्हाळ्यात एप्रिलनंतर ताे सर्वाधिक असताे. यासाठी वातावरणीय परिस्थिती जबाबदार असते. एमपीसीबीच्या नाेव्हेंबर महिन्याच्या अहवालात हे स्पष्ट दिसून येत आहे.

एमपीसीबीच्या निर्देशाकानुसार, एक्यूआय ० ते ५० पर्यंत असेल तर सर्वाेत्तम असेल. ५१ ते १०० पर्यंतचा एक्यूआय समाधानकारक आणि १०१ ते २०० पर्यंत मध्यम स्वरूपाचा असताे. मात्र, हा स्तरही लहान मुले, वृद्ध नागरिक व आजारी व्यक्तींसाठी हानिकारक असताे. २०० च्यावर गेल्यास परिस्थिती वाईट हाेते. नाेव्हेंबरमध्ये नागपूरच्या अहवालानुसार, महिन्यातील तब्बल १२ दिवस एक्यूआय २०० च्यावर हाेते. यातले तीन दिवस २५० च्यावर गेले हाेते. १२ दिवस ताे १५० च्यावर व २०० च्या खाली गेला आहे. केवळ ४ दिवस एक्यूआय १५० च्या खाली आहे, पण समाधानकारक नाही. दाेन दिवस डाटा उपलब्ध नाही. या प्रदूषणामध्ये धूलिकण म्हणजे पीएम-२.५ हे प्रदूषण सर्वांत परिणामकारक ठरले आहे.

विशेष म्हणजे हा डाटा केवळ सिव्हिल लाईन्सच्या जीपीओसमाेरील माॅनिटरवरून घेतला आहे, जेथे वाहतूक कमी आणि झाडे अधिक आहेत. हिंगणा एमआयडीसी, वर्धा राेड, वाडी राेड, गांधीबाग, सीए राेड, पारडी या भागात परिस्थिती कितीतरी वाईट असण्याची शक्यता आहे.

Web Title: Shocking! Nagpur's air is polluted for thirty days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.