धक्कादायक, वॉशिंग मशीनचा करंट लागून महिलेचा मृत्यू

By योगेश पांडे | Published: July 20, 2023 04:30 PM2023-07-20T16:30:30+5:302023-07-20T16:34:41+5:30

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Shockingly, woman dies after being electrocuted by washing machine | धक्कादायक, वॉशिंग मशीनचा करंट लागून महिलेचा मृत्यू

धक्कादायक, वॉशिंग मशीनचा करंट लागून महिलेचा मृत्यू

googlenewsNext

नागपूर : कपडे धुण्यासाठी जास्त श्रम लागू नये यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करण्यावर महिलांचा भर असतो. मात्र एका महिलेवर वॉशिंग मशीनमुळे काळाने घाला घातला. कपडे धुत असताना मशीनचा करंट लागून महिलेचा मृत्यू झाला. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.

सिंधु हिरालाल शेंडे (४३, आनंदनगर, जयताळा मार्ग) असे मृतक महिलेचे नाव आहे. १९ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता त्या घरी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धूत होत्या. त्यावेळी त्यांना अचानक मशीनचा करंट लागला व त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना नातेवाईकांनी खाजगी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सोनेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Shockingly, woman dies after being electrocuted by washing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.